• Download App
    बारसूमध्ये पवारांचे पुन्हा "लक्ष"; जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीने सत्यजित चव्हाण शरद पवारांच्या भेटीला Pawar's "attention" again in Barsu; Satyajit Chavan met Sharad Pawar through the mediation of Jitendra Awad

    बारसूमध्ये पवारांचे पुन्हा “लक्ष”; जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीने सत्यजित चव्हाण शरद पवारांच्या भेटीला

    प्रतिनिधी

    मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी काही अटींसह पाठिंबा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुन्हा बारसू विषयात “लक्ष” घातले आहे. रिफायनी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीने शरद पवारांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली आहे. Pawar’s “attention” again in Barsu; Satyajit Chavan met Sharad Pawar through the mediation of Jitendra Awad

    बारसूतील प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जशी ठाम विरोधी भूमिका घेतली आहे, तेवढी ठाम विरोधी भूमिका अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली नाही. पण मध्यंतरी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका बारसू प्रकल्पाला अनुकूल झाली होती. अजितदादांनी तशा आशयाचे वक्तव्य देखील केले होते.



    मात्र आज काही वेळापूर्वीच शरद पवारांनी बारसू प्रकल्पाच्या विषयात मध्ये पुन्हा “लक्ष” घालून सत्यजित चव्हाण या आंदोलनकर्त्यांच्या नेत्याला भेट दिली आहे. या भेटीतून आमदार जितेंद्र आव्हाड आणि आंदोलनकर्ते नेते सत्यजित चव्हाण यांना नेमके काय साध्य काय साध्य करायचे आहे?? आणि शरद पवारांना या भेटीतून वेगळे काय साध्य करवून घ्यायचे आहे??, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

    Pawar’s attention again in Barsu; Satyajit Chavan met Sharad Pawar through the mediation of Jitendra Awad

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा