विशेष प्रतिनिधी
नागपूर : पक्ष चालवायचा म्हणुन शरद पवार हे अनिल देशमुख यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही. देशमुखांनी पैसे गोळा करण्याची मागणी केली पण पैसे गोळा केले का, असे म्हणून त्यांचे समर्थन करणे योग्य आहे का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.Pawar supports Deshmukh to run party, but leader like him is not expected to do so, criticizes Devendra Fadnavis
नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, अमरावतीत घटना झाली, ती कशामुळे झाली? कुठलीही घटना त्रिपुरात घडली नसताना, कपोलकल्पित घटनेच्या आधारावर मोर्चे काढून हिंदुंची दुकाने तोडण्यात आली. यावर तथाकथित सेल्युलर का बोलत नाहीत? प्रश्न कोणी निर्माण केला, यापासून दूर भटकून अशाप्रकारे भाजपवर आरोप करुन प्रश्न कधी सुटणार नाही.
फडणवीस म्हणाले, मला असं वाटत आहे, त्यांच्या पक्षाची अशी अवस्था झाली आहे, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घेणे गरजेचं आहे. शेवटी शरद पवार हे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना अशी भूमिका घ्यावी लागते. खरं म्हणजे, शरद पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांकडून असं अपेक्षितच नाही.
Pawar supports Deshmukh to run party, but leader like him is not expected to do so, criticizes Devendra Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय नेते शरद पवार उतरले जिल्हा बॅँक निवडणुकीच्या मैदानात, शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी फोनाफोनी
- स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये शिपायाने व्यक्तीला शॉर्ट्स ऐवजी फुल पँट घालून बँकमध्ये येण्याची केली सूचना
- WATCH : समीर वानखेडे यांचे बार अँड रेस्टॉरंट परवाना त्यांच्या नावावर असल्याचे उघड
- बॉब बिसवासचा ट्रेलर पाहून अभिषेकच्या अभिनयाचे अमिताभ बच्चन यांनी केले कौतुक