विशेष प्रतिनिधी
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ संपूर्ण देशभर प्रचंड गाजतो आहे. या एका पुरस्कारामुळे शरद पवारांसह काँग्रेस नेत्यांचीही प्रचंड राजकीय कोंडी झाली आहे. एकीकडे पंतप्रधान मोदींबरोबर शरद पवार आणि काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे व्यासपीठावर बसणार आहेत, तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते मोदींविरोधात पुण्यात निदर्शने करणार आहेत.Pawar Refuses to Meet Anti-Modi Delegation of Baba adhav ; “Political earthquake” among progressives!
पण त्या पलीकडे जाऊन पुण्यातल्या पुरोगाम्यांमध्ये आज एक “राजकीय भूकंप” झाला आहे, तो म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालच्या मोदीविरोधी शिष्टमंडळाला शरद पवारांनी भेटायचेच नाकारले आहे. बाबा आढावांच्या नेतृत्वाखालचे हे शिष्टमंडळ शरद पवारांना भेटून मोदींच्या बरोबर आपण व्यासपीठवर बसू नये, अशी विनंती करणार होते. परंतु, शिष्टमंडळाची ही विनंती मान्य करता येण्यासारखी नव्हती म्हणून पवारांनी या शिष्टमंडळाला भेटायचेच नाकारले. ही बातमी झी 24 तास वेब पोर्टलने दिली आहे.
पवारांनी मोदी प्रेमापोटी बाबा आढावांसारख्या पुरोगामी कार्यकर्त्याच्या शिष्टमंडळाला भेटायचेच नाकारल्याने पुरोगाम्यांमध्ये “राजकीय भूकंप” झाला आहे.
बाबांच्या नेतृत्वाखालच्या या शिष्टमंडळात शरदनिष्ठ राष्ट्रवादी, ठाकरे गट, काँग्रेस, आम आदमी पार्टी वगैरे पक्षांचे पुण्यातले स्थानिक नेते आणि कार्यकर्ते सामील झाले होते. ते पवारांचे पुण्यातले निवासस्थान “1 मोदी बाग” येथे जाऊन पवारांना भेटणार होते. पण पवारांनी मोदींबरोबरच्या कार्यक्रमाला हजर राहण्याचे ठामपणे ठरविल्याने त्यांनी या शिष्टमंडळाची भेट नाकारली, असे झी 24 तासच्या बातमीत नमूद केले आहे.
पुरोगाम्यांची चिडचिड
एरवी शरद पवार बाबा आढाव आणि अनेक पुरोगामी यांच्या कार्यक्रमांना जातात. त्यांच्याविषयी आदर बाळगतात. पण लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाला जाऊ नये अशी विनंती करायला येणाऱ्या बाबांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाला पवारांनी भेट नाकारल्याने पुरोगाम्यांची प्रचंड चिडचिड झाली आहे.
वंदना चव्हाण “वैयक्तिक” नाराज!!
राष्ट्रवादीच्या पवार गोटातल्याच खासदार वंदना चव्हाण यांनी देखील पवारांच्या निर्णयावर “वैयक्तिक” नाराजी व्यक्त केली आहे. पण ही नाराजी व्यक्त करताना त्यांनी सावध भूमिका घेत आपण पवारांच्या भूमिकेवर “वैयक्तिक” नाराज असलो, तरी त्यांना कार्यक्रमाला जावे लागेल. कारण अजित पवार राष्ट्रवादीतून फुटण्याआधी पंतप्रधान मोदींना स्वतः पवारांनीच फोन करून लोकमान्य टिळक पुरस्कार कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण दिले होते म्हणून पवारांनी त्यांच्याबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणे अपरिहार्य आहे, असे वक्तव्य वंदना चव्हाण यांनी केले.
नाराजीचे खरे कारण
पण वंदना चव्हाण यांच्या या वैयक्तिक नाराजी मागे आणखी एक वेगळे “राजकीय रहस्य” दडले आहे, ते म्हणजे दोनच दिवसांपूर्वी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची एक बैठक झाली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वंदना चव्हाण हजर होत्या. त्या बैठकीत एका वरिष्ठ काँग्रेस नेत्याने पवारांना उद्देशून अतिशय खोचक उद्गार काढले होते. “झोपलेल्याला जागे करता येऊ शकते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला कसे जागे करणार??”, असे खोचक उद्गार अतिवरिष्ठ काँग्रेस नेत्याने काढले. पण त्या वक्तव्यावर वंदना चव्हाण त्या बैठकीत काही बोलू शकल्या नव्हत्या. त्यांची राजकीय कोंडी असहनीय होती. पण वंदना चव्हाण यांनी आज पुण्यात मात्र “वैयक्तिक” नाराजी बोलवून दाखवत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे.
Pawar Refuses to Meet Anti-Modi Delegation of Baba adhav ; “Political earthquake” among progressives!
महत्वाच्या बातम्या
- धावत्या ट्रेनमध्ये गोळीबार, RPFचे ASI आणि 3 प्रवासी ठार, जयपूर-मुंबई ट्रेनमध्ये पालघरजवळ फायरिंग
- जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचं पडद्यामागील कलाकारांसाठी मोठा पाऊल,
- कुलगाममध्ये अतिरेक्यांनी केले आर्मीचे जवानाचे अपहरण, लेहला होती पोस्टिंग; गाडीत आढळले रक्ताचे डाग
- पुण्यातून पकडलेल्या दहशतवाद्यांकडून 500 जीबी डेटा हस्तगत; अनेक ठिकाणी ड्रोन कॅमेऱ्याने टेहळणी