• Download App
    पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले, पण एकदाही टर्म पूर्ण करू शकले नाहीत; फडणवीसांचा प्रतिटोला|Pawar has been the Chief Minister four times, but has not completed a single term; Fadnavis's counterpart

    पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले, पण एकदाही टर्म पूर्ण करू शकले नाहीत; फडणवीसांचा प्रतिटोला

    प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते आहे, या वक्तव्यावरुन काल सुरू झालेला राजकीय गदारोळ आजही थांबायला तयार नाही. आज त्यांना या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टोला हाणला आहे.Pawar has been the Chief Minister four times, but has not completed a single term; Fadnavis’s counterpart

    सत्ता येते आणि जाते त्याचे फार मनाला लावून घ्यायचे नसते. मी देखील महाराष्ट्राचा चार वेळा मुख्यमंत्री झालो, पण मला त्याची आठवण नाही नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी फडणवीस यांना चिमटा काढला होता.



    त्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले की, होय पवार साहेब हे मोठे नेते आहेत. ते महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत हे खरे. पण त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार कधीच दीड वर्ष दोन वर्ष एवढेच मुख्यमंत्रिपद त्यांना टिकवता आले. त्यांना पाच वर्षांची एक टर्म देखील पूर्ण करता आली नाही.

    मी पाच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिलो आहे. चाळीस वर्षानंतर संपूर्ण टर्म पूर्ण करणारा मुख्यमंत्री होण्याचा मान आपल्याला मिळाला आहे, याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून देत पवारांना प्रतिटोला लगावला आहे.

    जनतेच्या पाठिंब्यामुळे मला अजूनही मुख्यमंत्री असल्यासारखेच वाटते, असे विधान देवेंद्र फडणवीस यांनी गिरगावातल्या मराठी कट्ट्यावर केले होते. त्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना राजकीय चिमटे काढून घेतले.

    फडणवीस यांनी देखील पवारांसह दोन्ही पक्षाच्या नेत्यांना आपण टर्म पूर्ण केलेले मुख्यमंत्री आहोत हे सुनावून त्यांच्या पक्षातल्या राजकीय उणिवा दाखवून दिल्या आहेत. काँग्रेसचे मुख्यमंत्री क्वचितच टर्म पूर्ण करू शकले आहेत, तर राष्ट्रवादीला गेल्या तेवीस वर्षांमध्ये महाराष्ट्राचे एकदाही मुख्यमंत्री पद मिळवता आलेले नाही, याकडेही फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले आहे.

    Pawar has been the Chief Minister four times, but has not completed a single term; Fadnavis’s counterpart

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ