प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला नाही म्हणून शरद पवार यांचे नाव दाऊदशी जोडण्याच्या मुद्द्यावर राणे बंधूंविरोधात मुंबई पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सुरेश चव्हाण या व्यक्तीने याबद्दल तक्रार दाखल केली आहे. Pawar – Dawood – Malik opp rane brothers
नवाब मलिक यांचा राजीनामा घेत नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांवर निशाणा साधताना राणे बंधूंनी पवारांचा संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडला. असा संबंध जोडल्यामुळे राणे बंधूंविरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही तक्रार दिली आहे.
शरद पवारांचे नाव दाऊदशी जोडून जाणीवपूर्वक हिंदू – मुस्लिम तेढ निर्माण करून दंगल घडविण्याचा डाव असल्याचा आरोप एफआयआर मध्ये केला आहे. आमदार नितेश राणे यांनी आझाद मैदानावर बोलताना नवाब मलिक यांचा राजीनामा का घेत नाहीत?, अशी विचारण शरद पवारांना केली होती. वास्तविक नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री आणि सरकारचा आहे. पण अनिल देशमुखांचा मराठा म्हणून राजीनामा घेतला पण नवाब मलिक मुस्लिम असल्याकारणाने त्यांचा राजीनामा घेतला नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले होते. नितेश राणे हे हिंदू-मुस्लिम गटात तेढ, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सुरज चव्हाण यांनी तक्रारीत म्हटले आहे.
निलेश राणे यांनी शरद पवार हे दाऊदचा माणूस असल्याचे ट्विट केले होते. पवार साहेबच दाऊदचा माणूस आहे. खरोखर संशय येतो. ज्याने दाऊदच्या बहिणीशी व्यवहार केला, बॉम्बब्लास्टच्या आरोपींशी व्यवहार केला. त्यांचा राजीनामा का घेतला जात नाही? अनिल देशमुखांचा पटकन राजीनामा घेतला, मग नवाब मलिक कोण आहे? कोण लागतो शरद पवारांचा? असा सवाल निलेश राणे यांनी
ट्विटमधून उपस्थित केला आहे.
नितेश राणे आणि निलेश राणे हे बंधू जाणीवपूर्वक कट रचून समाजात प्रक्षोभक भाष्य करून तेढ निर्माण करत दंगल घडवून आणण्याच्या उद्देशाने शरद पवारांचे नाव दाऊद इब्राहिमशी जोडून अब्रुनुकसानी करत आहेत. दाऊदशी संबंध जोडल्याने शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, असेही सुरज चव्हाण यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
Pawar – Dawood – Malik opp rane brothers
महत्त्वाच्या बातम्या
- उध्दव ठाकरे आणि माफिया सेनेची गेली इज्जत, किरीट सोमय्या यांची टीका
- पक्ष हवालदिल, नेते सैरभैर, पळापळ झाली सुरू, कर्नाटकातील माजी केंद्रीय मंत्र्याचा कॉँग्रेसचा राजीनामा
- Kolhapur North Byelection : अपबीट मूडचा भाजप कोल्हापूर मध्ये “पंढरपूर” करणार?? शिवसेनेच्या राजेश क्षीरसागरांकडे लक्ष!!
- पीएफ रकमेवर ८.५% ऐवजी ८.१० % दराने व्याज ४० वर्षांतील सर्वात कमी दर; ६ कोटी कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी