• Download App
    Pawankhind : स्वराज्याच्या लढ्यातील बाजीप्रभूंच्या महापराक्रमाची विजयगाथा ! 'पावनखिंड' चित्रपट ३१ डिसेंबरला होणार रिलीज|Pawankhind: Victory story of Baji Prabhu's great deeds in the battle of Swarajya! 'Pavankhind' to be released on 31st Decembe

    Pawankhind : स्वराज्याच्या लढ्यातील बाजीप्रभूंच्या महापराक्रमाची विजयगाथा ! ‘पावनखिंड’ चित्रपट ३१ डिसेंबरला होणार रिलीज

    ३१ डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपानं पाहायला मिळणार आहे.Pawankhind: Victory story of Baji Prabhu’s great deeds in the battle of Swarajya! ‘Pavankhind’ to be released on 31st Decembe


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: झुंजार बांदल सेनेच्या आणि नरवीर बाजीप्रभूंच्या पराक्रमाचा अभूतपूर्व अध्याय उलगडून दाखविणाऱ्या दिग्पाल लांजेकर लिखित-दिग्दर्शित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची मोठी उत्सुकता चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांना होती.३१ डिसेंबरला स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची ही विजयगाथा ‘पावनखिंड’ चित्रपटाच्या रुपानं पाहायला मिळणार आहे.

    पावनखिंडीचा रणसंग्राम घडून आज ३६१ वर्षांचा काळ उलटला असला तरी हा अतुलनीय लढा आणि बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा मराठी जनमानसावर आजही अधिराज्य गाजवत आहे.



     

    पावनखिंडीचा थरार दर्शविणारं चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं आहे. घोडखिंडीत बाजीप्रभूंनी आपल्या प्राणांची आहुती देत गनिमांची वाट रोखून धरत पराक्रमाची शर्थ केली होती.

    बाजीप्रभूंच्या पवित्र रक्तानं पावन झाल्यानं या खिंडीला पुढं ‘पावनखिंड’ नाव पडलं. शिवचरित्रातील सुवर्णपान असलेल्या पावनखिंडीची गाथा लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘पावनखिंड’ चित्रपटात मांडली आहे.

    शिवराज अष्टकातील ‘पावनखिंड’ हे तिसरं पुष्प आहे. यात बाजीप्रभू देशपांडे, बांदल सेना आाणि मावळ्यांनी दिलेला अभूतपूर्व लढा पाहायला मिळणार असून यात मराठीतील आघाडीतील कलाकार आहेत.

    Pawankhind: Victory story of Baji Prabhu’s great deeds in the battle of Swarajya! ‘Pavankhind’ to be released on 31st December

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस