- मराठी तरुणांची रेल्वेची नोकरी Passed Marathi youth should be Appointed in Railways Immediately: Bala Nandgaonkar Urges Railway
विशेष प्रतिनिधी
मुंबई : रेल्वेच्या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मराठी उमेदवारांना तातडीने रुजू करून घ्यावे, अशी आग्रही मागणी मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी केली.
उत्तीर्ण झालेल्या परंतु रेल्वेने रुजू करून न घेतलेल्या तरुणांच्या प्रश्नाबाबत बाळा नांदगांवकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली. अनेक मुलांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.तेव्हा त्यांनी रेल्वेच्या मुख्य व्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला होता.
नंदगांवकर म्हणाले, राज ठाकरे यांनी सांगितल्यामुळे मी आज मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक यांच्या भेट घेतली त्यानंतर मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक यांनी सांगितले की येत्या आठ दिवसात सर्व बाबीचा विचार व माहिती घेऊन या संदर्भात योग्य ते निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
- उत्तीर्ण मराठी तरुणांना रेल्वेमध्ये रुजू करून घ्या
- परीक्षेचे उत्तीर्ण पण रुजू नसल्याची तरुणांना चिंता
- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही केली चर्चा
- राज ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार अधिकाऱ्यांना भेटले
- बाळा नंदगांवकर आणि अधिकारी यांच्यात चर्चा
- आठ दिवसात माहिती समजेल: रेल्वे अधिकारी
Passed Marathi youth should be Appointed in Railways Immediately: Bala Nandgaonkar Urges Railway