अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे.PARMBIR SINGH: ED reported Parambir Singh’s reply
विशेष प्रतिनिधी
मुंबई:अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील मनी लाँड्रिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे.
3 डिसेंबरच्या सकाळी तीन समन्सनंतर परमबीर सिंग ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले ईडी मुंबईच्या उपसंचालकांच्या उपस्थितीत अनेक तास त्यांची चौकशी केली
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या Money Laundering प्रकरणात ED ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे. ३ डिसेंबरला परमबीर सिंग ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. यावेळी ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केले होते. सीबीआयने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर ईडीने यात अनिल देशमुखांविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने याआधीच अनिल देशमुख यांचे PA आणि PS यांना अटक केली आहे. याचसोबत अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशलाही ईडीने अटक केली आहे.
PARMBIR SINGH: ED reported Parambir Singh’s reply
महत्त्वाच्या बातम्या
- NASHIK : साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक ; सातत्याने छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य …
- लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण ; केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली दिलासादायक माहिती
- ११ डिसेंबरला मनसे महाराष्ट्रभर राबवणार ‘समुद्र किमारा स्वच्छता मोहीम’ ; अमित ठाकरेंनी केल मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन
- ममता नव्हे, तर भाजप विरोधातला चेहरा यूपीए सामुदायिकरीत्या ठरवेल; भूपेश बघेल यांची नेतृत्वाच्या वादात उडी