• Download App
    परमबीर सिंहांच्या अडचणीत पुन्हा वाढ, पोलिसांनी जारी केली लुकआऊट नोटीस, बनावट केसद्वारे कोट्यवधी उकळल्याचा आरोप । Parambir Singh's problem escalates again, Maharashtra police issues lookout notice, accuses him of collecting crores of rupees through fake case

    परमबीर सिंहांच्या अडचणीत पुन्हा वाढ, पोलिसांनी जारी केली लुकआऊट नोटीस, बनावट केसद्वारे कोट्यवधी उकळल्याचा आरोप

    व्यापारी केतन तन्ना यांच्या तक्रारीवरून 30 जुलै रोजी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि इतर 27 जणांविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे. Parambir Singh’s problem escalates again, Maharashtra police issues lookout notice, accuses him of collecting crores of rupees through fake case


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. आता ठाणे पोलिसांनी वसुलीच्या एका प्रकरणात परमबीर सिंहच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली आहे. गुरुवारी एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. ते म्हणाले की, व्यापारी केतन तन्ना यांच्या तक्रारीवरून 30 जुलै रोजी ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि इतर 27 जणांविरोधात नोटीस जारी करण्यात आली आहे.

    एखाद्या व्यक्तीला देशातून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी लुकआऊट नोटीस जारी केली जाते. वसुलीच्या आरोपावर नोंदवलेल्या एफआयआरमध्ये पूर्व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि इतर अनेक पोलीस अधिकाऱ्यांची नावे यात समाविष्ट आहेत.



    तन्ना यांनी आरोप केला की, जेव्हा परमबीर सिंह जानेवारी 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान ठाणे पोलीस आयुक्त होते, तेव्हा त्यांना गंभीर प्रकरणांमध्ये अडकवण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून 1.25 कोटी रुपये वसूल करण्यात आले.

    अलीकडेच ठाण्यात परमबीर सिंगच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. परमवीर सिंगसह 28 लोकांविरुद्ध खंडणी, धमकीसह विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या एफआयआरमध्ये माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, डीसीपी दीपक देवराज, एनटी कदम आणि राजकुमार कोथमिरे यांच्यासह 28 जणांना आरोपी करण्यात आले आहे.  गुंड रवीसह पोलिसांनी बनावट केस केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    इतरांकडूनही कोट्यवधींची वसुली

    कारवाई न केल्यामुळे आणि आरोपींच्या यादीतून नावे वगळल्याबद्दल केतन तन्नाकडून 1 कोटी 25 लाख रुपये, सोनू जालानकडून 3 कोटी 45 ​​लाख रुपये आणि किरण मालाकडून 1.50 कोटी रुपये वसूल करण्यात आले. यादरम्यान परमबीर सिंह हे मुंबई पोलीस आयुक्त होते.

    Parambir Singh’s problem escalates again, Maharashtra police issues lookout notice, accuses him of collecting crores of rupees through fake case

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!