प्रतिनिधी
ठाणे : उल्हासनगरमधील वादग्रस्त नेते आणि माजी आमदार पप्पू कलानी हे स्वगृही आले आहेत. त्यांच्या गटाचे 21 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले आहेत.या नगरसेवकांमध्ये पप्पू कलानी यांची सून पंचम कलानी यांचाही समावेश आहे. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेशापूर्वी भाजप नगरसेवक पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.Pappu Kalani back home in Ulhasnagar; 21 corporators of Kalani group in NCP; Push the BJP
कालच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. त्या भेटीत कलानी गटाचे 21 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानुसार हे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश केला.
या पक्ष प्रवेश समारंभाला जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. पप्पू कलानी गटाच्या नगरसेवकांच्या पक्ष प्रवेशामुळे उल्हासनगर पालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या सत्तांतरातून राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे.
कारण उल्हासनगरमधील हे २२ नगरसेवक भाजपच्या कमळ चिन्हावर निवडून आले आहेत. सर्व नगरसेवक कलानी गटाचे आहेत आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपला हा धक्का मानला जात आहे.
Pappu Kalani back home in Ulhasnagar; 21 corporators of Kalani group in NCP; Push the BJP
विशेष प्रतिनिधी
- क्रूझ ड्रग्ज प्रकरण : आर्यनच्या जामिनावरील सुनावणी सलग दुसऱ्या दिवशी पुढे ढकलली, उद्या दुपारी अडीच वाजता एनसीबी मांडणार आपली बाजू
- एनडीपीएस कायद्यातील तरतुदींना सर्वोच्च न्यायालयात आव्हान, याचिकाकर्ते म्हणाले- तरुणांना अडकवण्याऐवजी त्यांना सुधारण्यावर भर द्यावा
- बिहारच्या राजकारणात आता आँखियोंसे नही, जुबाँ से गोली मारे…!!
- जलयुक्त शिवार : चांगल्या योजनेला आघाडी सरकारने बदनाम केलं., सरकारने शेतकऱ्यांची माफी मागावी – केशव उपाध्ये