• Download App
    पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल केले ट्विट, गडकरींनी दखल घेत कंत्राटदारांवर तत्काळ कारवाईचे दिले आदेश । Pankaja Munde tweets about shoddy work in highway project, Nitin Gadkari orders action against contractors

    पंकजा मुंडेंचे एक ट्वीट आणि गडकरींची तत्काळ कारवाई, पैठण-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या भेगा कंत्राटदाराला भोवणार

    Pankaja Munde tweets : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याद्वारे ट्विटरवर निकृष्ट रस्ते बांधकामाबद्दल तक्रार मिळाली. पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर नाराज होत पंकजांनी केलेल्या ट्वीटची तत्काळ दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरींनी कारवाईचे आदेश दिले आहेत. Pankaja Munde tweets about shoddy work in highway project, Nitin Gadkari orders action against contractors


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना सोमवारी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याद्वारे ट्विटरवर निकृष्ट रस्ते बांधकामाबद्दल तक्रार मिळाली. पैठण-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामावर नाराज होत पंकजांनी केलेल्या ट्वीटची तत्काळ दखल घेत केंद्रीय मंत्री गडकरींनी कारवाईचे आदेश दिले आहेत.

    भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्याने आपल्याच पक्षाच्या केंद्रीय मंत्र्याच्या अधिकारक्षेत्रात येणारे “निकृष्ट काम” दाखवले. यावर गडकरींनीही या प्रकरणाची त्वरित दखल घेतली आणि कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

    पंकजा मुंडे यांनी ट्वीट केले की, “पैठण पंढरपुर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत…माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच त्यांनाही हे अजिबात चालणार नाही नाही… तत्काळ दखल घेतली जाईल…”

    यावर केंद्रीय मंत्रालयाने त्वरित उत्तरही दिले आहे. ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि सर्व खराब झालेले पॅनेल लवकरात लवकर बदलले जातील.”

    टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की, “खरेतर पंकजा मुंडे यांनी गडकरींना वैयक्तिकरीत्या रस्त्याच्या कामाची माहिती दिली असती तर बरे झाले असते.” मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणाले, “गडकरीजींना कमी लेखण्याचा प्रश्नच नव्हता… भेगा दाखवण्याचा हेतू हा बेजबाबदार असलेल्या कंत्राटदारांविरुद्ध कारवाईसाठी होता.”

    Pankaja Munde tweets about shoddy work in highway project, Nitin Gadkari orders action against contractors

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mallikarjun Kharge : काँग्रेस संघटना मजबूत करणार, ‘संविधान वाचवा’ रॅलींसह देशभरात जनआंदोलन सुरू होणार

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Naresh Mhaske : उद्धव यांनी राज ठाकरेंना शिवसेना सोडण्यास भाग पाडले – नरेश म्हस्के