• Download App
    कोरोना आणि अतिवृष्टी काळातील रखडलेली नुकसानभरपाई, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा यावरून पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला लगावला टोला | Pankaja Munde targets the state government for the problems of corona and excess rainfall delayed compensation

    कोरोना आणि अतिवृष्टी काळातील रखडलेली नुकसानभरपाई, स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा यावरून पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला लगावला टोला

    विशेष प्रतिनिधी 

    सावरगाव बीड  : दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर आयोजित केलेल्या मेळाव्यामध्ये आज आपली उपस्थिती दर्शवली होती. पंकजा मुंडे या ठिकाणी हेलिकॉप्टरमधून दाखल झाल्या. या वेळी त्यांनी हेलिकॉप्टरमधून लोकांवर फुलांचा वर्षावही केला. याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, कोणत्याही नेत्याची चमचेगिरी करण्यासाठी ह्या फुलांचा वर्षाव केलेला नसून भगवानदादा आणि जनतेसाठी हा फुलांचा वर्षाव केला आहे.

    Pankaja Munde targets the state government for the problems of corona and excess rainfall delayed compensation

    पुढे त्या असंही म्हणाल्या की, आपण जिथे जन्म घेतला, त्या मातीचा आणि जातीचा कमीपणा वाटून घेऊन चालणार नाही. राजघराणं असो किंवा वंचित घराणं आपण जिथे जन्मलो त्या मातीची आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे.


    महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांना खूश करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा, जनतेच्या हिताची कामे करावीत, मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणासाठी नेहमी प्रयत्नशील असू : पंकजा मुंडे


    पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा दौरा रद्द होणार की काय असे वाटत असतानाही पंकजाताईंनी मेळाव्यामध्ये हजेरी लावली होती. या बाबतीत त्या म्हणाल्या की, पंकजाताईंना घरात बसलेले पाहून खुश झालेल्या लोकांना मी आज सांगते, मी उसाच्या फडात जाऊन लोकांशी संवाद साधणार, नाशिकच्या दौर्यावर जाणार, नवी दिल्ली, मुंबई येथे सर्वत्र जाणार. पण लोकोपयोगी कामे करणार. कोरोना काळामध्ये फक्त मी बाहेर पडले नाही पण घरात नुसती बसून नव्हते. आम्ही कोविड सेंटर सुरू केले होते. आम्ही घरोघरी डबे देखील पोहोचवले. औषधांची व्यवस्था देखील आम्ही यावेळी केली होती. कोरोना काळात तुम्हाला भेटायला आले असते तर चाललं असतं का तुम्हाला? असा प्रश्न त्यांनी लोकांना विचारला.

    कोरोना महामारी नंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुसतंच पॅकेज जाहीर करून चालणार नाही तर प्रत्येकाच्या हातामध्ये मदत पोहोचवावी आणि आमची दिवाळी गोड करावी, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. राज्य सरकार कडून किंवा पालकमंत्र्यां कडून कोणती मदत शेतकर्यांपर्यंत पोहोचली नाहीये. जी काही मदत मिळाली आहे ती केंद्र सरकारकडून मिळाली आहे. ह्या शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

    ऊसतोड कामगार मंडळाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, हे मंडळ आम्ही उभा केले पण याची म्हणावी तशी प्रगती आम्ही करू शकलो नाहीत. आणि असे का झाले याचे कारण देखील तुम्हाला माहित आहे अस त्या म्हणाल्या.

    Pankaja Munde targets the state government for the problems of corona and excess rainfall delayed compensation

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस