मुंबई : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झ तहटक्याने निधन झाले. बिरजू महाराज यांचे पूर्ण नाव ब्रिजमोहन नाथ मिश्रा होते. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज (83) यांनी रविवारी मध्यरात्री दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. लखनौ घराण्याशी संबंधित, बिरजू महाराज हे कथ्थक नर्तक तसेच शास्त्रीय गायक होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते..Pandit Birju Maharaj is no more
त्यांचा नातू स्वरांश मिश्रा यांनी सांगितले की, काल रात्री उशिरा बिरजू महाराज नातवासोबत खेळत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने साकेत येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. काही दिवसांपूर्वी महाराजांना किडनीचा आजार झाला होता.
बिरजू महाराज कथ्थकचा समानार्थी शब्द होते. ते लखनौच्या कालका बिंदादिन घराण्याचे सदस्य होते. बिरजू महाराज यांचे पूर्ण नाव ब्रिजमोहन नाथ मिश्रा होते. त्यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1937 रोजी लखनौच्या प्रसिद्ध कथ्थक नर्तक कुटुंबात झाला.
Pandit Birju Maharaj is no more
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील १४ मराठी पोलीस बनले ‘आयपीएस’केंद्रीय गृह विभागाचे शिक्कामोर्तब
- लग्न करून आणले आणि मित्रांच्या हवाली केले, शिक्षिकेवर पतीसह पाच जणांचा सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार
- सपा, बसपा तसेच एमआयएम मुळे ‘यूपी’त ‘एम फॅक्टर’चे त्रिभाजन
- भाजप सोडून गेलेले मंत्री स्वामीप्रसाद मौर्य, दारा सिंह यांच्या प्रभावक्षेत्रात आता अमित शाह लक्ष घालणार