प्रतिनिधी
भिवंडी : भिवंडी येथे मेरी पाठशाला या संस्थेने सुरू केलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात धक्कादायक प्रकार घडला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी यावेळी १९ आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. Pakistan Zindabad slogans in Bhinwadi; 19 students in police custody
भाषणात पाकिस्तान झिंदाबाद
भिंवडी येथे गेल्या ३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांना मेरी पाठशाला या संस्थेने पाठबळ दिले आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतु या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याने भाषण देताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर याठिकाणी गोंधळ सुरू झाला.
१९ जण पोलिसांच्या ताब्यात
या घडलेल्या प्रकारची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये आतापर्यंत १४ पुरूष आणि ५ महिला अशा १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Pakistan Zindabad slogans in Bhinwadi; 19 students in police custody
महत्वाच्या बातम्या
- आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाआधी ७२ तास RT-PCR चाचणी अनिवार्य; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी
- उत्तर प्रदेशात भारत जोडो यात्रा; काँग्रेसचे निमंत्रण आल्यावर समाजवादी पार्टीची कोंडी; पण राहुलजींच्या महत्त्वाकांक्षेला खोडा
- नोटबंदीचा निर्णय कायदेशीरदृष्ट्या वैधच; सुप्रीम कोर्टाचा 4 – 1 बहुमताने निर्वाळा!!; वाचा तपशीलवार!!
- राष्ट्रीय केमिकल फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबईमध्ये 284 जागांसाठी भरती; करा अर्ज
- लोकसभा निवडणूक 2024 : एकीकडे भाजपचे महाराष्ट्रात मिशन 16; दुसरीकडे काँग्रेसच्या हक्काची जागा खेचण्याची राष्ट्रवादीची तयारी