प्रतिनिधी
नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात लावणार असल्याची घोषणा मंगळवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. मुंबईत विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात हे तैलचित्र लावले जाईल. painting of Balasaheb will be installed in Vidhan Bhavan
राहुल नार्वेकर म्हणाले, मला सर्व सदस्यांना हे सूचित करताना अतिशय आनंद होत आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र आपण विधान भवन, मुंबई येथील मध्यवर्ती सभागृहात बसवित आहोत. या तैलचित्राचा अनावरण सोहळा बाळासाहेब ठाकरे यांच्या येत्या जयंतीदिनी, २३ जानेवारी, २०२३ रोजी सायंकाळी 5.00 वाजता विधानभवनाया मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. सर्व सदस्यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हावे, अशी मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो.
सावरकर ते बाळासाहेब; गोमूत्र ते भारतरत्न; गदारोळ हिंदुत्ववाद्यांमध्येच; चूड लावणारे नामानिराळे!!
ऑगस्ट २०२२ मध्ये पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी असे तैलचित्र बसविण्याबाबत माझ्याकडे निवेदन केले होते. त्यानुषंगाने याबाबतची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे मी या सभागृहाला आश्वासित केले होते. त्यानुसार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधानभवनात समारंभपूर्वक झळकणार आहे, असेही अध्यक्ष नार्वेकर म्हणाले.
painting of Balasaheb will be installed in Vidhan Bhavan
महत्वाच्या बातम्या