• Download App
    साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे ; शिवेंद्रराजे यांचा घणाघात , DCC बँक आणि पालिकेवरून वाढला वाद Oxygen comes to Satara because of Udayan Raje; Shivendra Raje's quarrel with DCC Bank and the municipality escalated

    साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे ; शिवेंद्रराजे यांचा घणाघात , DCC बँक आणि पालिकेवरून वाढला वाद

    खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी १० तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन केलं.Oxygen comes to Satara because of Udayan Raje; Shivendra Raje’s quarrel with DCC Bank and the municipality escalated


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात DCC बँक आणि पालिकेवरून वाद वाढला आहे. आज (दि. २६ ) खासदार उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर सहकारी संस्था मोडकळीस काढल्या अशी अप्रत्यक्ष टीका करत त्यांनी १० तारखेपर्यंत अर्ज माघारी घ्यावे, असे आवाहन केलं.

    दरम्यान शिवेंद्रराजे भोसले यांनी उदयनराजेंना टोला लगावला आहे. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले की , ” आपल्या साताऱ्याला ऑक्सिजनचा पुरवठा देवाकडून बंद होणार होता तो सुध्दा मीच सुरू केला आहे, असे स्टेटमेंट उदयनराजेंकडून येईल.”



    सर्वपक्षीय पॅनेलमध्ये खासदार उदयनराजेंना घेणार का? असा प्रश्न शिवेंद्रराजे यांना विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, मीच पॅनेलमध्ये आहे का हे मलाच माहीत नाही. पॅनेलचा निर्णय शरद पवार, अजित पवार व रामराजे नाईक- निंबाळकर घेतील.

    सातारा जिल्हा बँकेत काल शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यात आलेले आहेत. यामध्ये मी तसेच राष्ट्रवादीच्या अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत अद्याप पॅनेलचे कोणतेही नाव नाही तसेच हे पॅनल पक्षविरहित असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन व आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

    Oxygen comes to Satara because of Udayan Raje; Shivendra Raje’s quarrel with DCC Bank and the municipality escalated

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    जहाल माओवादी प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला तब्बल 15 वर्षांनी पुण्यात अटक; ATS ची कारवाई!!

    राहुल गांधी तर फक्त “निवडक” चुकांची जबाबदारी घेतली; पण काँग्रेसच्या चुकांची किंमत सगळ्या देशाला मोजावी लागली!!

    “नरकातला स्वर्ग” पुस्तकाच्या प्रकाशनाचे निमंत्रण देण्यासाठी संजय राऊत शरद पवारांच्या घरी; स्वतः पवारांनीच दिली माहिती!!