आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज पुन्हा एकदा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. वित्तसंस्था नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालनच्या ठराव आराखड्यास मंजुरी दिली आहे. जेट एअरवेजने आर्थिक संकटामुळे १७ एप्रिल २०१९ मध्ये आपले काम थांबवलं आहे.Overcoming the financial crisis, Jet Airways is preparing to take off again
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज पुन्हा एकदा भरारी घेण्याच्या तयारीत आहे. वित्तसंस्था नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) मुंबई खंडपीठाने कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालनच्या ठराव आराखड्यास मंजुरी दिली आहे. जेट एअरवेजने आर्थिक संकटामुळे १७ एप्रिल २०१९ मध्ये आपले काम थांबवलं आहे.
कारलॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालन यांना ९० दिवसांमध्ये संबंधित यंत्रणांकडून मंजुरी मिळवायच्या आहेत. आॅक्टोबर २०२० मध्ये जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी कॅलरॉक कॅपिटल आणि मुरारी लाल जालन यांनी लावलेल्या बोलीला कर्जदारांनी मान्यता दिली होती.
मात्र या दोन्ही कंपन्यांकडे एअरलाइन्स चालवण्याचा अनुभव नाही. कॅलरॉक कॅपिटल एक अॅसेट मॅनेजमेंट कंपनी आहे तर मुरारी लाल जालन संयुक्त अरब अमिरातीमधील उद्योजक आहेत. योजनेनुसार, जेट एअरवेजला पुनरुज्जीवित करण्यासाठी १३७५ कोटींच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव ठेवला आहे.
तसंच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची मंजुरी मिळाल्यानंतर सहा महिन्याच्या आत इतर ३० विमान कंपन्यांसोबत जेट एअरवेज पुन्हा काम सुरु करेल असंही सांगण्यात आलं आहे.जेट एअरवेजला मार्च २०२० ला आर्थिक वर्षाच्या अखेरीस २८४१ कोटींचं नुकसान झालं होतं. कंपनीची विमानसेवा जवळपास गेल्या दोन वर्षांपासून स्थगित आहे
. कंपनीने बीएसईकडे दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये कंपनीचं एकूण उत्पन्न ३५४ कोटी रुपये होतं. याआधीच्या आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये कंपनीला ५५३५ कोटींचं नुकसान झालं होतं. कंपनी सध्या दिवाळखोरीच्या संकटात आहे.
भारतात कोरोनामुळे प्रवाशांची मागणी कमी होण्याच्या आधीपासूनच विमानसेवेतून पैसा कमवणं आव्हानात्मक झालं आहे. विमान तिकीटांवरुन सुरु असलेली स्पर्धा तसंच महागड्या तिकीटांमुळे अनेक विमान कंपन्या मार्केटमध्ये टिकून राहावं यासाठी धडपडत आहेत. एकेकाळी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची विमान कंपनी असणारी किंगफिशर एअरलाइन्स २०१२ मध्ये बंद पडली असून कर्जाच्या ओज्याखाली दबलेली एअर इंडियादेखील कित्येक वर्षांपासून खरेदीदाराचा शोध घेत आहे.
Overcoming the financial crisis, Jet Airways is preparing to take off again
महत्त्वाच्या बातम्या
- अमरिंद सिंगांचा पत्ता कट…!!; पंजाबमध्ये काँग्रेस सोनियाजी – राहुलजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणार; मल्लिकार्जुन खर्गे यांचे महत्त्वपूर्ण विधान
- पंतप्रधानांनी अश्रू गाळल्यामुळे नव्हे; तर ऑक्सिजन पुरवठ्यामुळे लोकांचे जीव वाचले असते; राहुल गांधींचे टीकास्त्र
- महाबळेश्वरच्या गुहांतील वटवाघुळांमध्ये आढळला घातक निपाह व्हायरस ; संशोधन अहवालात स्पष्ट
- अरे बापरे… ओडिशात अवघ्या अर्ध्या तासात नागरिकास दिले लसीचे दोन डोस