• Download App
    सत्यजित तांबेंवरून महाविकास आघाडीत धुसफूस; संजय राऊतांच्या विधानावर काँग्रेसचा आक्षेप Over Satyajit Tambe, the Maha Vikas Aghadi is in shambles

    सत्यजित तांबेंवरून महाविकास आघाडीत धुसफूस; संजय राऊतांच्या विधानावर काँग्रेसचा आक्षेप

    प्रतिनिधी

    मुंबई : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील सत्यजित तांबेंच्या अपक्ष उमेदवारी अर्जामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळाच ट्विस्ट आला आहे. पण त्याहीपेक्षा महाविकास आघाडीत धुसफूस वाढली आहे. Over Satyajit Tambe, the Maha Vikas Aghadi is in shambles

    काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्ष म्हणून काम करताना महाविकास आघाडीत समन्वय गरजेचा आहे, असे विधान केले होते. पण राऊतांच्या या विधानावर काँग्रेसने आपेक्ष नोंदवला आहे.

    नानांचा आक्षेप

    काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, ‘संजय राऊत दिल्लीत असतात, त्यांना फार गोष्टी माहिती नसतात. त्यामुळे ते अनावधानाने बोलले असतील. तांबे काँग्रेसचे उमेदवार नाहीत. ते बंडखोर असतील. त्यांना काँग्रेसचा कोणताही पाठिंबा नसेल. महाविकास आघाडी सत्यजित तांबे यांच्या विरोधात जशाच तसा उमेदवार देण्याचा प्रयत्न करेल. येत्या १६ तारखेला कळेल.



     आघाडीत दुमत नव्हते : अशोक चव्हाण

    काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण म्हणाले की, महाविकास आघाडीत समन्वय आहे. कारण ही जागा तशी काँग्रेसची आहे. सत्यजित तांबे यांना काँग्रेसचे वरच्या सभागृहातील नेते म्हणून घोषित केले होते. त्यामुळे ही जागा काँग्रेसची होती. यावरून मविआत दुमत नव्हते.

    संजय राऊत नक्की काय म्हणाले?

    तीन भिन्न पक्षाचे लोकं एकत्र आले आणि सरकार चालवले. त्यांच्यामध्ये उत्तम समन्वय होता. ज्या पद्धतीने सरकार चालवताना समन्वय आणि एकोपा होता. तोच समन्वय, तोच एकोपा हा विरोधी पक्षात काम करताना असायला हवा. तरच आपण पुढल्या सर्व लढाया एकत्रपणे लढू शकतो, असे संजय राऊतांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.

    Over Satyajit Tambe, the Maha Vikas Aghadi is in shambles

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!