विशेष प्रतिनिधी
धुळे : एसटी कर्मचाऱ्यांचे शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी महाराष्ट्रात जोरदार आंदोलन सुरू आहे. धुळ्यात देखील ३९ व्या दिवशी दुखवटा आंदोलन सुरू आहे. एसटीचे वाहक संजय यशवंत सोनवणे यांचा घरीच हृदयिकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे धुळे शहरात एकच खळबळ उडाली. एसटी कर्मचारी व नातेवाईकांनी हा मृतदेह थेट धुळे शहरातील विभागीय कार्यालयात आणून कार्यालयाला घेराव घातला. Outrage over death of ST employee in Dhule; Demand to file charges against the officers
गेल्या ३९ व्या दिवसांपासून संजय सोनवणे हे एसटी कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते. शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी धुळे शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये एसटी कर्मचारी संपावर आहेत, दरम्यान मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
आज संपात सहभागी झालेल्या कर्मचारी व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडून मेस्मा कायदा लावण्याच्या बातमी पाहत असतानाच संजय सोनवणे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि कर्मचाऱ्यांनी संजय सोनवणे यांचा मृतदेह शहरातल्या एसटी विभागीय कार्यालयांमध्ये आनत अधिकाऱ्यांना घेराव घातला. यावेळेस विभागीय कार्यालयात संजय सोनवणी यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रचंड तणावाचे वातावरण झाले होते.
एसटी कर्मचारी आणि नातेवाईक आक्रमक झाल्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळेस कर्मचाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांसह नातेवाईकांनी केली.
Outrage over death of ST employee in Dhule; Demand to file charges against the officers
महत्त्वाच्या बातम्या
- भारतात ओमीक्रोनचे १०१ रुग्ण; महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ रुग्ण आढळले; दक्षता घेण्याचे केंद्राचे आवाहन
- मुलींचे लग्नाचे वय वाढवण्यास मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड, मुस्लिम लीग आणि अन्य मुस्लिम लोकप्रतिनिधींचा विरोध!!
- ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
- Asian Champions Trophy : चक दे ! भारताची पाकिस्तानवर ३-१ ने मात ; सेमीफायनलध्ये धडक ; भारत स्कोअर बोर्डवर अव्वल …