विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि व्यावसायिक श्रीधर पाटणकर यांच्या आणखीन काही मालमत्ता ईडीच्या रडारवर आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीने पाटणकरांची भागीदारी असलेल्या ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील आणखी एका गृहनिर्माण प्रकल्पावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.Other properties of CM’s brother in law Shridhar Patankar also on ED’s radar
पाटणकरांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीला हवाला आॅपरेटर नंदकिशोर चतुवेर्दी याने बनावट कंपनीच्या माध्यमातून एकूण ३० कोटींचे विनातारण कर्ज दिले. ही रक्कम पाटणकरांनी अन्य बांधकाम प्रकल्पातही वापरल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडीचे अधिकारी पाटणकरांच्या कंपनीने राबविलेल्या अन्य प्रकल्पांचीही माहिती गोळा करत आहेत.
ईडीने पाटणकरांची भागीदारी असलेल्या ठाण्यातील पाचपाखाडी परिसरातील आणखी एका गृहनिर्माण प्रकल्पावर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे. ईडीच्या काही अधिकाऱ्यांनी गुरुवारी या गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. या प्रकल्पात चतुवेर्दीने आर्थिक गुंतवणूक केल्याचा ईडीला संशय आहे. सोबतच पाटणकरांच्या मुंबई आणि ठाण्यातील प्रकल्पांचीही झाडाझडती ईडीचे अधिकारी करत आहेत.
या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या चतुवेर्दीच्या शोधासाठी ईडीचे पथक मुंबईबाहेर आहे. त्याला समन्स बजावूनदेखील ते हजर न झाल्यामुळे त्यांना दुसरा समन्स बजावण्यात येणार आहे. तसेच, ते परदेशात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Other properties of CM’s brother in law Shridhar Patankar also on ED’s radar
महत्त्वाच्या बातम्या
- ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सोनिया गांधींच्या समोरच काँग्रेसवर केला हल्लाबोल, ठरवले एअर इंडियाच्या दुर्दशेला जबाबदार
- नाशकात भगवी शॉल घालून ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटासाठी गेलेल्या महिलांना रोखलं, थिएटरबाहेरच काढायला लावली गळ्यातील शॉल, भाजपची मुख्यमंत्र्यांवर टीका
- कोरोनामुळे मृत्यूंचा घोटाळा : नुकसानभरपाईच्या खोट्या दाव्यांवर सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, महाराष्ट्रासह 3 राज्यांतून पडताळणी
- Uniform Civil Code : पहिल्या कॅबिनेट बैठकीत उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा, समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय, निवडणुकीत दिले होते आश्वासन