• Download App
    मुला-मुलींच्या शाळेसाठी जागा 'बार्टी'च्या ताब्यात देण्याचे आदेश । Order to hand over the space for the boys' school to 'Barti'

    मुला-मुलींच्या शाळेसाठी जागा ‘बार्टी’च्या ताब्यात देण्याचे आदेश

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : येरवडा महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह कोविड केअर सेंटर म्हणून वापरले गेले. कोरोना बाधित बंद्यांच्या कारागृहासाठी तात्पुरत्या स्वरूपात वापर करण्यात आला. तेथे शासकीय सफाई कामगारांच्या मुला-मुलींची शाळा सुरू करण्यात येणार असल्याने ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहेत. Order to hand over the space for the boys’ school to ‘Barti’

    बार्टी येरवडा संकुलासमोर असलेल्या तसेच एकाच आवारात असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतीगृह व क्रांतीज्योती सावित्री बाई फुले मुलींचे वसतीगृह कोरोना कालावधीत कोविड-19 बाधीत बंद्यांसाठी तात्पुरते कारागृह घोषीत करण्यात आले होते.



    आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंतची शाळा सुरु करण्याबाबत शासनाचे आदेश प्राप्त झाले आहेत. तसेच राष्ट्रीय सफाई कार्मचारी आयोग, नवी दिल्ली यांनी बार्टी संस्थेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी सर्वांगिण विकासाचे प्रशिक्षण सुरु करणे व येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुला-मुलींची निवासी शाळा तात्काळ सुरु करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

    त्यानुसार शाळा सुरु करणे आवश्यक असून शाळेसाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने व शाळा निवासी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतिगृह व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह शाळा सुरु करण्यासाठी ताब्यात देण्याबाबतचे आदेश डॉ. देशमुख यांनी दिले आहेत.

    Order to hand over the space for the boys’ school to ‘Barti’

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!