प्रतिनिधी
पणजी : गोव्यात काँग्रेसने धुडकावल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन न्यू विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली खरी पण ही घोषणा अद्याप फक्त प्रसार माध्यमांमध्ये आणि शिवसेना राष्ट्रवादीच्या निवेदनामध्ये दिसून येत आहे. अद्याप दोन्ही पक्षांनी उमेदवार यादी देखील जाहीर केलेली नाही.Oral gun on Shiv Sena’s mere Fadnavis
पण तरी हे दोन्ही पक्ष यादीच्या आधीच अडले असताना शिवसेनेचे खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी मात्र भाजपचे गोवा प्रभारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार तोफा डागून घेतल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर नटसम्राट या शब्दात टीकास्त्र सोडले होते. त्यावर संजय राऊत यांनी होय, आम्ही नटसम्राट आहोत. शब्द फिरवणारे सोंगाड्या नाही, असे प्रत्युत्तर दिले. गोवा हे रंगभूमीचे राज्य आहे. तिथून अनेक नटसम्राट भारताच्या रंगभूमीला मिळाले आहेत याची आठवण संजय राऊत यांनी करून दिली. पण त्याच वेळी अध्यक्ष शिवसेनेची यादी का जाहीर झाली नाही?, या प्रश्नाला त्यांनी बगल दिली. भाजपचे 34 उमेदवार जाहीर झाले आहेत.
आम आदमी पार्टीने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला आहे. काँग्रेस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी मात्र यादी आधीच आडवे आहेत. नेमक्या किती जागा लढवणार हे देखील त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
Oral gun on Shiv Sena’s mere Fadnavis
महत्त्वाच्या बातम्या
- धुळ्यात साक्री नगरपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना- भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी ; शिवसेना कार्यकर्त्याच्या बहिणीचा मृत्यू
- इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात आज होणार सुनावणी
- देशाबद्दल खोटी माहिती पसरवणारे युट्यूब चॅनेल्स आणि संकेतस्थळ होणार ब्लॉक-अनुराग ठाकूर