विशेष प्रतिनिधी
पुणे : सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांचे वार्षिक ॲाडिट रिपोर्ट सादर करण्यास महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी ३१ जानेवारी पर्यंत दिलेली मुदतवाढ संपण्यास केवळ पाच दिवस राहिले आहेत. Only five days left to file trust audit
मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम , १९५० व त्याअंतर्गत नियमांनुसार दरवर्षी सनदी लेखापालांकडून लेखापरीक्षण करून संपूर्ण ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाच्या पोर्टल वर ॲानलाईन सादर करावा लागतो. असा लेखापरीक्षण अहवाल अपलोड झाल्यावर त्याची ॲानलाईन पोहोच व सर्व विश्वस्तांची नावे, पॅन नंबर असलेला ‘फॅार्म ९-ड’ भरून धर्मादाय विभागाच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागतो.
त्यानंतर अशा सादर केलेल्या ॲाडिट रिपोर्टच्या प्रतींचा संच राज्यातील विभागवार असलेल्या सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या अकौंट विभागात दाखल करून त्याची पोहोच घ्यावी लागते.
कोविड काळातील प्रतिबंधांमुळे अनेक संस्थांची लेखापरिक्षणे झाली नसल्याने विशेष मुदतवाढीची विनंती अनेक संस्था व चार्टर्ड अकौंटंट यांनी केली होती.या सर्व बाबींची दखल घेऊन ॲाडिट रिपोर्ट आयकर विभागाकडे व धर्मादाय विभागाच्या वेबसाईट वर अपलोड करून तेथील ॲानलाईन पोहोच व फॅार्म ९-ड सह संपूर्ण ॲाडिट रिपोर्टच्या कागदोपत्री प्रती संबंधित धर्मादाय कार्यालयांमध्ये दाखल करण्याची मुदत ३१ जानेवारीला संपत आहे.
तरी सर्व सार्वजनिक ट्रस्ट व धर्मादाय संस्थांनी या पाच दिवसात वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करून दंडात्मक कारवाई टाळावी असे आवाहन पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार यांनी संस्थाचालकांना केले आहे.
Only five days left to file trust audit Only five days left to file trust audit
महत्त्वाच्या बातम्या
- शेती, पाणीपुरवठा यांचा वीजपुरवठा खंडितच करावा लागेल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- तीव्र डोकेदुखी नंतर होतो ओमायक्रॉन संसर्ग डॉ. परवेश मलिक यांची माहिती
- पश्चिम उत्तर प्रदेशातील डाव अखिलेश यादव यांच्यावरच उलटणार, ओवेसी फॅक्टर ठरणार समाजवादी पक्षासाठी धोक्याची घंटा
- राष्ट्रवाद जिवंत ठेवण्याची प्रेरणा नेताजींकडून घेतली पाहिजे ; सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण