विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : गणेशोत्सवानंतर सर्वात मोठा नवरात्र हा सण साजरा केला जातो. दरवर्षी नवरात्र महोत्सवात अंबाबाईच्या दर्शनासाठी देश विदेशातून लोक कोल्हापूरमध्ये दाखल होतात. पण मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना महामारीमुळे भक्तांना मंदिरात प्रवेशही नाकारला होता. महाराष्ट्र शासनाने नुकताच मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर यावेळी नवरात्रोत्सवात अंबाबाई दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावे लागणार आहे. पण मुखदर्शनासाठी बुकिंग करणे गरजेचे नाही असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे.अंबाबाई मंदिर पहाटे चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले राहणार आहे.
Online booking for Ambabai Darshan?
जोतिबा मंदिर व्यवस्था :
त्याचप्रमाणे ज्योतिबा मंदिरामध्ये ज्यांच्याकडे इ पास आहे, त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. जोतिबा मंदिर पहाटे तीन ते रात्री एक वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असणार आहे. तर
कधी सुरू होणार ऑनलाईन बुकिंग?
पाच ऑक्टोबरपासून हे ऑनलाईन बुकिंग सुरू करण्यात येईल अशी माहितीदेखील यावेळी देण्यात आली. ऑनलाइन बुकिंग करण्यासाठी मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे. प्रत्येक मोबाईल नंबर आणि आधार नंबरवर एकच बुकिंग शक्य असेल. बुकिंग करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाहीये. त्यामुळे ठरावीक वेळेत दर्शन मिळणार याची खात्री मिळणार आहे.
दर्शनासाठी रांगांची व्यवस्था :
मुखदर्शनाचा लाभ सर्वांना घेता येणार आहे. यासाठी महाद्वार वरून रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. बिनखांबी गणेश मंदिरापासून पुढे ही रांग असणार आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ व्यासपीठ केले जाणार आहे. आणि तेथून मुखदर्शन घेता येणार आहे.
एका रांगेत साधारण तीन जण असतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तर राज्य शासनाच्या नियमानुसार ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, १० वर्षांखालील मुले आणि प्रेग्नेंट महिला यांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
नेहमीप्रमाणे कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केलेले नाहीयेत. तर मंदिरातील पालखी सोहळ्यासह आरतीलाही भाविकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. व्हीआयपी व्हीव्हीआयपी अशी कोणतीही स्वतंत्र रांगसुद्धा असणार नाही. मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम नित्यनियमाने होतील त्यांचे प्रक्षेपण मोठ्या स्क्रीनद्वारे करण्यात येईल. गरुड मंडपातील अभिषेक देखील बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व मंदिर आणि राज्य शासनाच्या नियमांना अनुसरून उत्सव साजरा करावा अशी विनंती जिल्हाधिकारी यांनी यावेळी केली आहे.
Online booking for Ambabai Darshan?
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला