• Download App
    ऑक्टोबरमध्ये एक लाखांवर घरांची विक्री; मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला एक कोटींवर महसूल|One lakh home sales in October; Revenue of Rs. 1 crore to the State Government from stamp duty

    ऑक्टोबरमध्ये एक लाखांवर घरांची विक्री; मुद्रांक शुल्कातून राज्य सरकारला एक कोटींवर महसूल

    वृत्तसंस्था

    मुंबई :कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे उद्योगधंदे सावरत असून बाजारपेठाही स्थिरस्थावर होत आहे. परिणामी ऑक्टोबरमध्ये घरविक्रीत आणि महसुलात वाढ झाल्याचे चित्र आहे.One lakh home sales in October; Revenue of Rs. 1 crore to the State Government from stamp duty

    ऑक्टोबरमध्ये राज्यात १ लाख ६ हजार ८३१ घरे विकली असून यातून मुद्रांक शुल्क वसुलीच्या रूपाने राज्य सरकारला १ कोटी ८३१ कोटींचा महसूल मिळाला आहे.
    मार्च २०२० मध्ये कोरोनाचे संकट आले आणि त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला. त्यामुळेच एप्रिल २०२० मध्ये राज्यात सर्वात कमी केवळ ७७८ इतकीच घरे विकली गेली होती.



    राज्य सरकारने मुद्रांक शुल्क दरात सवलत लागू केली. याचा चांगला परिणाम सप्टेंबर २०२० मध्ये झाला आणि घरविक्रीचा आकडा एक लाखाच्या पुढे जाऊ लागला.
    डिसेंबर २०२० मध्ये तर विक्रमी घरविक्री झाली.

    तब्बल २ लाख ५५ हजार ५१० घरे डिसेंबरमध्ये विकली गेली आणि यातून २ हजार २१२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळाला.कोरोनाकाळात केंद्र, राज्य सरकारने बांधकाम व्यावसायासंदर्भात अनेक धोरणात्मक निर्णय घेतल्याने त्याचा फायदा घरविक्रीला झाला.

    मुंबईचा आकडा वाढताच

    राज्यात ऑक्टोबरमधील १ लाख ६ हजार ९८२ घरविक्रींपैकी ८ हजार ५८६ घरे ही मुंबईतील आहेत. तर या घरविक्रीतून ५५० कोटींचा महसूल मिळाला आहे. मागील तीन महिन्यांच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये घरविक्रीत पुन्हा चांगली वाढ झाली आहे.

    जुलैमध्ये विक्री झालेल्या घरांचा आकडा ६ हजार ७८४ असा होता आणि यातून ४२० कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. तर सप्टेंबरमध्ये ७ हजार ७९९ घरांची विक्री झाली होती.

    One lakh home sales in October; Revenue of Rs. 1 crore to the State Government from stamp duty

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस