• Download App
    अहमदनगरमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळल्याने एक जण ठार , तीन जण जखमी One killed, three injured in Ahmednagar elevator collapse

    अहमदनगरमध्ये इमारतीची लिफ्ट कोसळल्याने एक जण ठार , तीन जण जखमी

     

    जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ही लिफ्ट कशामुळे कोसळली याची माहिती मिळू शकली नाही.One killed, three injured in Ahmednagar elevator collapse


    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : अहमदनगर शहरातील मार्केट यार्ड येथील एका दुकानातील लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळली.ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली.दरम्यान या दुर्घटनेत एक जण ठार, तर तीन जण जखमी झाले आहेत.घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

    जखमींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.जखमींवर अहमदनगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान ही लिफ्ट कशामुळे कोसळली याची माहिती मिळू शकली नाही. भाऊसाहेब झेंडे (वय १९) असे मयत युवकाचे नाव आहे. या अपघातात ओंकार अरूण निमसे (वय १९), प्रिया सचिन पवार (वय ४०) व शीतल शेषेराव चिमखडे (वय २४) हे जखमी झाले आहेत.

    घटना काय घडली ?

    अहमदनगर शहरातील स्टेशन रस्त्यावरील मार्केट यार्ड आवारातच अभय मशिनरी नावाचे तीन ते चार मजली दुकान आहे.दरम्यान याठिकाणी शेतीसाठी लागणारे औजारे मिळतात.तसेच या दुकानात लिफ्टही बसविण्यात आलेली आहे.दरम्यान शनिवारी दुपारच्या सुमारास ही लिफ्ट तिसऱ्या मजल्यावरुन खाली कोसळली.

    या दुर्घटनेत लिफ्टमधील एक जण ठार झाला आहे.तर तीन जण जखमी झाले आहेत.दरम्यान घटनास्थळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे व त्यांच्या पथकाने पाहणी केली.कोतवाली पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे.याबाबत पुढील तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    One killed, three injured in Ahmednagar elevator collapse

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना