विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद: शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी जालना येथील रामनगर सहकारी साखर कारखान्यामध्ये शंभर कोटीचा घोटाळा केला आहे.त्या संदर्भातली पुरावे माझ्याकडे असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.One hundred crore rupees scam of Shiv Sena’s Arjun Khotkar : kirit somyya
औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर सोमय्या आले आहेत. शुक्रवारी त्यांनी भाग्यनगर येथील स्वर्गीय प्रमोद महाजन पत्रकार भवन येथे पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला आहे.महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक घोटाळेबाज मंत्री असून २३ जणांचे बिंग फोडले आहे.
त्यात शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी १०० कोटी पेक्षा अधिक घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
- अर्जुन खोतकर यांचा शंभर कोटींचा घोटाळा
- जालना रामनगर साखर कारखान्यामध्ये घोटाळा
- महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक घोटाळेबाज
- आजपर्यंत २३ मंत्र्याचे बिंग आणले उघडकीस
- अर्जुन खोतकर यांचा त्यात समावेश