• Download App
    आयटी छाप्यांवर शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते! । On IT raids, Sharad Pawar said, government guests came to Ajit Pawar, but we are not worried about the guests!

    आयटी छाप्यांवर शरद पवार म्हणाले, अजित पवारांकडे सरकारी पाहुणे आले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते!

    आगामी सोलापूर महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार0 यांनी आज सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शरद पवारांनी दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या आयटी छाप्यांवरही भाष्य केले आहे. On IT raids, Sharad Pawar said, government guests came to Ajit Pawar, but we are not worried about the guests!


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : आगामी सोलापूर महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार0 यांनी आज सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात शरद पवारांनी दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या आयटी छाप्यांवरही भाष्य केले आहे.

    सोलापूर महापालिकेवर

    यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, ” भाजपा सोडून इतर पक्षांची एकजूट करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, सन्मानाची वागणूक नाही मिळाली तर महापालिका स्वबळावर लढवून झेंडा फडकवायचा आहे. यामध्ये 50% जागा या महिलांना देण्यात येणार आहेत. आणि जर महापालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आली तर मला सोलापूरला जुने दिवस दाखवायचे आहेत. हिंजवडी, मगरपट्टा येथे आय टी सेंटर झाल्यामुळे पुणे शहराच अर्थकारण बदललं आहे. त्यामुळं जे हिंजवडीला होऊ शकत ते सोलापूरला का होऊ शकतं नाही.”



    अजित पवारांवरील आयटीच्या छाप्यांवर

    पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, “काल अजित पवार यांच्याकडे सरकारी पाहुणे येऊन गेले, पण पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते. निवडणुकीच्या अगोदर मला इडीची नोटीस आली होती त्यामुळं मी स्वतः ईडीच्या ऑफिसला गेलो आणि नंतर महाराष्ट्राने त्यांना येडी ठरवलं.” दरम्यान, या कार्यक्रमामध्ये काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि इतर पक्षातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये पक्ष प्रवेश केल्याचं बोललं जात आहे.

    On IT raids, Sharad Pawar said, government guests came to Ajit Pawar, but we are not worried about the guests!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ