दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या कोरोना विषाणूच्या नव्या वेरिएंटमुळं जगभरात भीतीचं वातावरण आहे. OMICRON UPDATE: The new variant is seven times more dangerous; Omicron causes panic around the world
विशेष प्रिनिधी
मुंबई : जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट घोंगावू लागलंय. दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियटनं सर्वांची चिंता वाढवलीय. WHOनं या व्हेरियंटला ओमिक्रॉन असं नाव दिलं असून हा विषाणू अतिशय चिंताजनक असल्याचं म्हंटलंय. हा व्हेरियंट डेल्टापेक्षा कित्येकपट घातक असल्यानं आरोग्य यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. या नव्या व्हेरियंटमुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊनची भीती व्यक्त होतीय.
या व्हेरिएंटचा संसर्गाचा वेग डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. वेगवेगळ्या चर्चा या व्हेरिएंटबद्दल सुरू असून, तर जाणून घेऊया या व्हेरिएंटबद्दल…
कोरोनाची लाट ओसरतेय असं वाटत असतानाच आता कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घातलाय.
दक्षिण आफ्रिकेतील नेटवर्क फॉर जिनोमिक्स निगराणी नेटवर्क अर्थात NGS-SA (Network for Genomics Surveillance in South Africa) ला सोमवारी (22 नोव्हेंबर) हा नवीन व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट आल्याचं प्रथम जाहीर करण्यात आलं. या व्हेरिएंटमध्ये SARS-CoV-2 संबंधित व्हायरस आढळून आले आहेत.
ओमिक्रॉन व्हेरिएंटमध्ये कोरोनाचे अनेक म्युटेशन आढळून आले आहेत.
B.1.1.529 या नावानं ओळखल्या जाणा-या व्हेरियंटला WHOनं ओमिक्रॉन असं नाव दिलंय. द.आफ्रिकेच्या तीन प्रांतात दररोज आढळणा-या 90 टक्के रूग्णांमध्ये ओमिक्रॉन व्हेरियंट आढळून येतोय. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी ही संख्या केवळ 1 टक्के होती. त्यावरून ओमिक्रॉन किती वेगानं पसरतोय याची कल्पना येईल.
दक्षिण आफ्रिकेतील सेंटर फॉर एपिडमिक रिस्पॉन्स अॅण्ड इनोव्हेशनचे संचालक प्रो. टुलियो डी ओलिवीरा यांनीही ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल माहिती देताना सांगितलं की, ‘हे म्युटेशन एका गुच्छाप्रमाणे आहे. यापूर्वी पसरणाऱ्या व्हेरिएंटपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे.’
ओमिक्रॉनच्या रिसेप्टर बायडिंग डोमेनमध्ये 10 वेगवेगळे म्युटेशन असून, रिसेप्टर बायडिंग डोमेन हा भागच शरीरातील पेशींच्या सर्वात आधी संपर्कात येता. डेल्टा व्हेरिएंटच्या रिसेप्टर बायडिंग डोमेनमध्ये 2 म्युटेशन होते.
या व्हेरिएंटचे 100 पेक्षाही कमी जिनोम सिक्वेन्स उपलब्ध असून, त्याबद्दल आमच्याकडे जास्त माहिती नाही. या व्हेरिएंटचे खूप सारे म्युटेशन असल्याचं आम्हाला माहिती आहे आणि याचा परिणाम व्हायरसच्या बिहेविअरही होऊ शकतो. या व्हेरिएंटला पूर्णपणे समजून घेण्यासाठी आणखी काही आठवडे लागू शकतात, असं WHO ने म्हटलं आहे.
OMICRON UPDATE: The new variant is seven times more dangerous; Omicron causes panic around the world
महत्त्वाच्या बातम्या
- कोणी आम्हाला छेडले नाही तर त्याला सोडणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
- दहशतवादी संघटनांचा मार्गदर्शक हाजी आरिफचा भारतीय लष्कराने केला खात्मा
- युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
- मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल