• Download App
    OMICRON LATUR : मराठवाडयातही ओमियक्रॉनची एन्ट्री! लातूरात दुबईहून परतलेल्या दोघांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटव्ह। OMICRON LATUR: OMICRON's entry in Marathwada too! One of the two returned from Dubai in Latur reported positive

    OMICRON LATUR : मराठवाडयातही ओमियक्रॉनची एन्ट्री! लातूरात दुबईहून परतलेल्या दोघांपैकी एकाचा रिपोर्ट पॉझिटव्ह

    कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने जगभरात भीती निर्माण केली असून, भारतातील रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना नियमांचं पालन करावं आणि लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन लातूरचे आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केलं आहे. OMICRON LATUR: OMICRON’s entry in Marathwada too! One of the two returned from Dubai in Latur reported positive


    विशेष प्रतिनिधी

    लातूर : राज्यातील मुंबई, पुणे, नागूपूर पाठोपाठ मराठवाड्यातही ओमिक्रॉनचा रुग्ण आढळून आला आहे. मराठवाड्यातील ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या हा पहिलाच रुग्ण आहे. हा रुग्ण लातुरात आढळून आला आहे. सदरील व्यक्ती औसा येथील आहे.

    परदेशातून परतणाऱ्या व्यक्तीबद्दल केंद्रानं सतर्कता बाळगली आहे. या व्यक्तींची विमानतळावरच चाचणी केली जात आहे. लातुर जिल्ह्यात आजतागायत 94 पेक्षा अधिक नागरिक विविध देशातून जिल्ह्यातील विविध भागात परतले आहेत.

    आरोग्य विभागाच्या वतीने या प्रवाशांची RTPCR कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आजतागायत चाचणी केलेल्या नागरिकांपैकी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं होतं. त्यांना ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाला की नाही? याचं निदान करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिगसाठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या दोन रुग्णांपैकी दुबई येथून आलेला औसा येथील रुग्णाला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं निदान झालं आहे.



    या रुग्णावर लातुर येथील पुरणमल लाहोटी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हणमंत वडगावे यांनी दिली. नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना नियमांचं पालन करावं आणि लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी केलं आहे.

    OMICRON LATUR: OMICRON’s entry in Marathwada too! One of the two returned from Dubai in Latur reported positive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस