• Download App
    OMICRON : ओमायक्रॉनमुळे पंढरपुर विठ्ठल मंदिरात 'अलर्ट'; दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमांची सक्ती । OMICRON : 'Alert' at Pandharpur Vitthal Temple due to OMICron; Compulsory rules for devotees coming for darshan

    OMICRON : ओमायक्रॉनमुळे पंढरपुर विठ्ठल मंदिरात ‘अलर्ट’; दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी नियमांची सक्ती

    विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता कडक निर्बंध  OMICRON: ‘Alert’ at Pandharpur Vitthal Temple due to OMICron; Compulsory rules for devotees coming for darshan


    विशेष प्रतिनिधी

    पंढरपुर : कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी आता कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. भाविकांना मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळण्याचीही विशेष सक्ती करण्यात आली आहे. तसेच मंदिराची दर दोन तासांनी स्वच्छताही केली जात आहे.

    दोन दिवसांपूर्वी कर्नाटकात दोघांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्याचं निदान झालं. त्यामुळे सोलापूरल जिल्ह्यालाही धोका संभवतो. विठ्ठल दर्शनासाठी पंढरपुरात येणाऱ्या कर्नाटकातील भक्तांची संख्या मोठी असते. सध्या एसटीचा संप सुरू असल्याने राज्यातील भाविक पंढरपुरात फारसे दिसत नाहीत. मात्र, परराज्यांतील भाविकांचा ओघ सुरूच आहे.

    यात प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा यासह इतर राज्यातून भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यामुळं मंदिर प्रशासनाने करोना तपासणीमध्ये अत्यंत काटेकोरपणा आणला आहे.



    याबाबत प्रशासन अलर्ट झाले असून, राज्य शासनाच्या आदेशानुसार शेजारील राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना सीमेवर आरटी-पीसीआर तपासणी, कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतल्याच्या प्रमाणपत्राची पडताळणी करूनच प्रवेश दिला जात आहे.

    राज्याच्या सीमेवरच पुरेशी दक्षता घेतली जात असल्याची महिती पंढरपुरचे प्रांताधिकारी तथा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे विशेष कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली. हजारोंच्या संख्येनं भाविक असूनही सोशल डिस्टन्सिंगचं पालन काटेकोरपणं व्हावे, यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्यात आलेली आहे. मंदिर प्रशासनाने सर्व प्रकारची खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे,’ अशी माहिती विट्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

    OMICRON : ‘Alert’ at Pandharpur Vitthal Temple due to OMICron; Compulsory rules for devotees coming for darshan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस