• Download App
    अमरावती जिहाद : नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्याने जिहादी मानसिकतेतूनच उमेश कोल्हेंची हत्या!! Nupur Sharma's post goes viral, killing Umesh Kolhe out of jihadi mentality

    अमरावती जिहाद : नुपूर शर्मांची पोस्ट व्हायरल केल्याने जिहादी मानसिकतेतूनच उमेश कोल्हेंची हत्या!!

    अमरावतीच्या डीसीपींचा खुलासा; एनआयएचा तपास सुरू Nupur Sharma’s post goes viral, killing Umesh Kolhe out of jihadi mentality

    वृत्तसंस्था

    अमरावती : अमरावती येथील फार्मासिस्ट उमेश कोल्हे हत्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्माची पोस्ट फॉरवर्ड केल्याने त्यांची हत्या झाल्याचे डीसीपी उमेश साळवे यांनी सांगितले याचा अर्थ जिहादी मानसिकतेच्या गुन्हेगारांनी ही हत्या केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था एनआयएची एन्ट्री झाली आहे. या प्रकरणी अमरावतीचे डीसीपी विक्रम साळी यांनीही नुपूर शर्मा प्रकरणातूनच हत्या झाल्याच्या घटनेला पत्रकार परिषदेत दुजोरा दिला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांची पोस्ट व्हायरल केल्यानेच झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

    उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रमाणेच उमेश कोल्हेचीही हत्या झाली. 21 जून रोजी अमरावती महाराष्ट्रातील उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. या प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने एनआयएकडे सोपवला आहे. मंत्रालयाच्या निवेदनानुसार हत्येमागील कट, संघटनांचा सहभाग आणि आंतरराष्ट्रीय संबंधांची कसून चौकशी केली जाईल. राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयए आणि एटीएसचे पथक अमरावतीत पोहोचले आहे.

     

     

    नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट लिहिल्याने फार्मासिस्ट उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत टिप्पणी केलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे त्यांची हत्या केली असावी, असा संशय भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवला आहे.

    उमेश कोल्हे यांचे बंधू मकरंद कोल्हे यांनी देखील आपल्या भावाने नुपूर शर्मा असे संबंधित काही पोस्ट फक्त काही ग्रुप्सना फॉरवर्ड केल्या होत्या. यात त्याचा कोणताही गुन्हा नव्हता. केवळ पोस्ट फॉरवर्ड केल्याने जर हत्येसारखी घटना घडत असेल तर काय बोलायचं? अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

    कधी झाली होती हत्या?

    उमेश कोल्हे हे मंगळवार दि.21 जून रोजी रात्री तहसील कार्यालय परिसरातील आपले मेडिकल स्टोअर्स बंद करून मुलगा संकेत (27) व सून वैष्णवी यांच्यासोबत वेगवेगळ्या दुचाकीने घरी जात होते. मार्गात न्यू हायस्कूल मेन समोरील गल्लीत तिघांनी लूटमारीच्या उद्देशाने उमेश यांना अडवून चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कोल्हेच्या हत्येची योजना आठवडाभरापासून आखली जात होती. 54 वर्षीय कोल्हे यांनी नूपुर शर्माच्या वादग्रस्त विधानाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या होत्या.

    या प्रकरणात अटक केलेल्या सहा आरोपींपैकी एक आरोपीने आपल्या कबुली जबाब नुपूर शर्मा तिच्या समर्थनाच्या पोस्टचा उल्लेख केला आणि त्यातून या प्रकरणाला राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने वेगळे वळण लागले आहे.

    Nupur Sharma’s post goes viral, killing Umesh Kolhe out of jihadi mentality

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस