• Download App
    आता तिरुपतीच्या धर्तीवर होणार पंढरपुरातील गर्दीचे नियोजन; जिल्हाधिकारी शिष्टमंडळाची तिरुपतीत पाहणी!! Now the planning of the crowd in Pandharpur will be on the lines of Tirupati

    आता तिरुपतीच्या धर्तीवर होणार पंढरपुरातील गर्दीचे नियोजन; जिल्हाधिकारी शिष्टमंडळाची तिरुपतीत पाहणी!!

    प्रतिनिधी

    पंढरपूर : पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून दररोज हजारो भाविक येतात. या भाविकांना अधिकच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांचे दर्शन नियोजित वेळेत सुलभ व्हावे, यासाठी तिरुपती बालाजी देवस्थान भाविकांना देत असलेल्या विविध सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या शिष्टमंडळाने केली आहे. Now the planning of the crowd in Pandharpur will be on the lines of Tirupati

    तिरुपती बालाजी देवस्थान येथे दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येतात. भाविकांना तिरुपती देवस्थान देणाऱ्या सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून शिष्टमंडळाने तेथील अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यामध्ये दर्शन रांग व्यवस्था आणि दर्शन रांगेत देण्यात येणाऱ्या सुविधा, गर्दीच्यावेळी करण्यात येणारे नियोजन, भाविकांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध यंत्रणा, वैद्यकीय सुविधा, वाहतूक नियोजन, वाहन व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, भोजन व्यवस्था, स्वच्छता, दर्शन व्यवस्था आदी विविध सुविधांची प्रत्यक्ष पाहणी केली. या सर्व बाबींची माहिती तिरुपती देवस्थानच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी उपस्थित होते.

    तिरुपती येथील नियोजन आणि व्यवस्था यातून काही मार्गदर्शक तत्त्वे घेऊन पंढरपूर मध्ये देखील दर्शन व्यवस्थेमध्ये काही सुधारणा करण्यात येणार आहे.

    Now the planning of the crowd in Pandharpur will be on the lines of Tirupati

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा