• Download App
    आता मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी!! Now MNS leader Bala Nandgaonkar's demand to install CCTV in mosques

    Raj Thackeray : आता मशिदींमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन केलेले वक्तव्य आणि त्यानंतर देण्यात आलेला अल्टिमेटम याने सध्या राजकीय वातावरण तापले आहे. नुकतीच रामनवमी आणि हनुमान जयंतीला निघालेल्या शोभायात्रेवर दगडफेक झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून आता मनसेने मशिंदीमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का?, असा सवाल उपस्थित केला आहे. Now MNS leader Bala Nandgaonkar’s demand to install CCTV in mosques

    मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का?

    जवळपास सगळ्या मंदिरात सीसीटीव्ही लावेल आहेत. परंतु, मशिदींमध्ये सीसीटीव्ही आहेत का सर्वधर्मीय प्रार्थना स्थळात सीसीटीव्ही यंत्रणा का करु नये हे सर्व केल्यास अनेक चुकीच्या गोष्टींना चाप बसेल. तसेच, असे करण्यास कोणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. सरकारने याची नियमावली बनवून त्याची कठोर अंमलबजावणी करावी अशी मागणी बाळा नांदगावकर यांनी केली आहे.

    भोंग्यांबाबत केंद्राने धोरण बनवावे

    शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले की, केंद्राने गोवंश हत्याबंदीचे उदाहरण देत पंतप्रधान मोदींनाही फटकारले. राऊत म्हणाले जसे गोवंश हत्याबंदीसाठी धोरण बनवले, पण काही राज्यांना अपवाद देण्यात आला. तशी दुटप्पी भूमिका न घेता एक राष्ट्रीय धोरण बनवून केंद्राने सर्वच राज्यांना दिलासा द्यावा. त्यांनी भोंग्यांबाबत राष्ट्रीय धोरण बनवावे, अशी मागणी देखील केली आहे.

    Now MNS leader Bala Nandgaonkar’s demand to install CCTV in mosques

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस