• Download App
    आता पोलीस महासंचालक संजय पांडेंचीही सीबीआयकडून चौकशी|Now, Director General of Police Sanjay Pandey is also being questioned by the CBI

    आता पोलीस महासंचालक संजय पांडेंचीही सीबीआयकडून चौकशी

    राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर सीबीआयकडे लेखी तक्रारही केली आहे. त्यामुळे पांडे यांची सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.Now, Director General of Police Sanjay Pandey is also being questioned by the CBI


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी सेटलमेंटसाठी दबाव आणल्याचा आरोप मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

    या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सिंग यांनी न्यायालयात याचिका दाखल केल्यावर सीबीआयकडे लेखी तक्रारही केली आहे. त्यामुळे पांडे यांची सीबीआयकडून चौकशी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.



    पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी परमबीर सिंग आणि महाविकास आघाडीत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सांगण्यावरूनच पांडे यांनी सिंग यांच्यावर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचे म्हटले आहे.

    परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास समर्थ नसल्याचं संजय पांडे यांनी सरकारला कळवलं आहे. त्यांनी तसं सरकारकडे स्पष्ट केलं आहे. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांनी पांडेंनी दबाव टाकल्याची लेखी तक्रार सीबीआयकडे दिली आहे.

    पोलीस महासंचालक पांडे यांच्याकडून माझ्यावर दबाव टाकण्यात आला. मुख्यमंत्री आणि राज्य सरकारविरोधातील तक्रार कोणत्याही परिस्थिती मागे घ्या असे ते म्हणाले. एकटा व्यक्ती सगळ्या यंत्रणांच्या विरोधात लढू शकत नाही.

    जर कुणी लढलंच तर तो यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे तक्रार मागे घ्या, असा सल्ला पांडे यांनी दिला. असं न केल्यास तुम्हाला अनेक प्रकरणात अडकवले जाईल. राज्य सरकारकडून क्रिमिनल अफेन्स दाखल केल्या जाईल.

    त्यामुळे तुम्हाला अनेक चौकश्यांना सामोरे जावं लागेल. जर तुम्ही तक्रार मागे घेतली तर या प्रकरणात मी तुम्हाला सवोर्तोपरी मदत करेल. वरिष्ठ म्हणून माझा सल्ला ऐका. अन्यथा तुम्ही खूप अडचणीत याल, असा सल्ला पांडे यांनी मला दिला होता, असं सिंग या पत्रात म्हणतात.

    पांडे यांनी 15 एप्रिल रोजी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करून मला बोलावून घेतलं होतं. पांडे यांच्याशी माझी जवळपास 45 मिनिटं चर्चा झाली. त्यानंतर मी थेट माझ्या वकिलाकडे गेलो, असे सिंग यांनी म्हटले आहे.

    Now, Director General of Police Sanjay Pandey is also being questioned by the CBI

     

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!