• Download App
    आता सीएनजीच्या दरात १ रुपया ८० पैशाची वाढ ; महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला कात्रीNow CNG price hike by Rs 1.80 paise; Inflation cuts pockets of matches

    आता सीएनजीच्या दरात १ रुपया ८० पैशाची वाढ ; महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला कात्री

    खरतर सहा महिन्यांनी सगळ्या नैसर्गिक वायूच्या दरांचा देशांतर्गत गॅस धोरणानुसार फेरआढावा घेतला जातो. त्यानुसार 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले होते.Now CNG price hike by Rs 1.80 paise; Inflation cuts pockets of matches


    विशेष प्रतिनिधी

    पुणे :दिवसेंदिवस महागाई वाढतच चालली आहे.दरम्यान या  महागाईमुळे सामन्यांच्या खिशाला रोजच्या दिवसाला कात्री लागत आहे.दरम्यानपेट्रोल डिझेल नंतर आता उरले – सूरले सीएनजीच्या दरात देखील 1 रुपया 80 पैशाची वाढ करण्यात आली आहे.लाखो ग्राहकांना सीएनजीचा पुरवठा केला जातो. त्यामुळे आता नागरीकांना 1 किलो सीएनजी साठी 63.90 रुपये मोजावे लागणार आहे.दरम्यान आता नागरिकांना या महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.



    मात्र दुसरीकडे दिवाळीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे याचा काही नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरतर सहा महिन्यांनी सगळ्या नैसर्गिक वायूच्या दरांचा देशांतर्गत गॅस धोरणानुसार फेरआढावा घेतला जातो.

    त्यानुसार 1 ऑक्टोबरला गॅसचे नवे दर निश्चित करण्यात आले होते. सीएनजी इंधनाचा वापर रिक्षा, कॅब, खासगी वाहनांमध्ये केला जातो. तसेच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या जवळपास निम्म्या बस सीएनजीवर धावतात.

    Now CNG price hike by Rs 1.80 paise; Inflation cuts pockets of matches

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार