वृत्तसंस्था
गडचिरोली / मुंबई : गडचिरोलीतील ग्यारापट्टी जंगलात महाराष्ट्र पोलिसांच्या c60 युनिटने काल तब्बल 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये कुप्रसिद्ध नक्षलवादी आणि भीमा कोरेगाव दंगलीचा आरोपी मिलिंद तेलतुंबडे याचाही समावेश आहे. Notorious Naxalite Milind Teltumbde killed in Gadchiroli encounter; Dilip Walse-Patal confirmed the news today
मात्र, या संदर्भात महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नक्षलवाद्यांची संपूर्ण ओळख पटल्याशिवाय नावे जाहीर करणार नाही, असे काल म्हटले होते. पण आता पोलिसांच्या हवाल्याने वळसे पाटील यांनी ही बातमी कन्फर्म केली आहे. आज पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे ट्विट केले आहे.
नक्षलवादी म्होरक्या आणि भीमा कोरेगाव दंगलीचा आरोपी मिलिंद तेलतुंबडेच्या डोक्यावर ५० लाख रुपये इनाम घोषित होते. यावरून त्याचे महत्व लक्षात येते. समाजाच्या काही घटकांमध्ये हिंसक विचारसरणी पेरून नक्षलवादी भरती करण्यात त्याचा मोठा हात होता. मिलिंद तेलतुंबडेच्या एन्काऊंटरने नक्षलवाद्यांना खूप मोठा झटका बसला आहे.
मिलिंद तेलतुंबडे कुख्यात शहरी नक्षलवादी आनंद तेलतुंबडे याचा भाऊ आहे. आनंद तेलतुंबडे एल्गार परिषद केस मध्ये UAPA कायद्या अंतर्गत तुरुंगात आहे. त्याच्या सुटकेसाठी काही राजकीय नेते आणि त्याचे शहरी नक्षलवादी साथीदार अनेक प्रयत्न करत असून ते त्यात अद्याप अयशस्वी ठरले आहेत.
मिलिंद तेलतुंबडेची पत्नी अँजेला सोनटक्के उर्फ राही उर्फ इश्कारा उर्फ सविता,उर्फ कविता ही बी.एस्सी.(मायक्रोबायॉलॉजी), एम्एस्सी.(झुऑलॉजी), एम्ए.(सोशॉलॉजी) व बी.एड. अशा शैक्षणिक पदव्या मिळवलेली असून मुंबई विद्यापीठात अभ्यास करत होती. तिला मराठी, हिंदी, इंग्रजी, फ्रेंच, माडिया, गोंडी भाषा उत्तम प्रकारे बोलता येतात. तिच्यावर पोलिसांच्या खुनासाहित अनेक आरोप असून ती सध्या जामिनावर बाहेर आहे.
Notorious Naxalite Milind Teltumbde killed in Gadchiroli encounter; Dilip Walse-Patal confirmed the news today
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी