• Download App
    तरुण स्पोर्ट बाईकऐवजी चक्क घोड्यावर स्वार पेट्रोलचा परवडत नाही, वडिलांकडून मुलाला घोडा|Not being able to afford Petrol; Horse gift from father to son in Aurangabad

    WATCH : तरुण स्पोर्ट बाईकऐवजी चक्क घोड्यावर स्वार पेट्रोलचा परवडत नाही, वडिलांकडून मुलाला घोडा

    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद :औरंगाबादमध्ये वडिलांकडून मुलाला घोडा भेट देण्यात आला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्यामुळे गाड्या वापरणे आता परवडत नसल्याने घोड वापरण्याचा निर्णय घेतल्याचे उघड झाले.Not being able to afford Petrol; Horse gift from father to son in Aurangabad

    गाडी घरी उभी करून त्या मुलाची शहरभर घोडेसवारी सुरु आहे. हा एक कुतूहलाचा विषय बनला आहे. पेट्रोल डिझेलचे भाव शंभरीच्या पार गेल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दुसरीकडे राज्य सरकार इंधनावरील कर कपात करत नसल्याने ही वेळ आता जनतेवर आली आहे.



    महाराष्ट्र सोडून अन्य राज्यात इंधनाच्या करात कपात केली आहे. राज्यात मात्र सरकारने दारूवरच्या करात मोठी कपात केली. मात्र इंधन करात कपात केली नाही. त्यामुळे आता वाहनांसाठी लोकांना घोड्याचा वापर करावा लागत आहे.

    राज्यात जनतेने घोड्यावरून प्रवास करण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याने राज्यात जणू शिवशाहीच आली की काय ? , असा प्रश्न पडू लागला आहे. काही दिवसांत लोक बैलगाडीतून प्रवास करतील, यात शंका नाही. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा दमनीतून प्रवास केला होता. यातून भविष्य फारच खडतर दिसत आहे, हे वरील उदाहरणांमुळे स्पष्ट होत आहे.

    •  पेट्रोलचे भाव गगनाला भिडले
    • गाडी घेऊन फिरणे झाले अवघड
    •  मुलाला घेऊन दिला घोडा
    • तरुण स्पोर्ट बाईक ऐवजी घोड्यावर स्वार
    • घोड्याचा दिवसभराचा खर्च ३० रुपये

    Not being able to afford Petrol; Horse gift from father to son in Aurangabad

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!