प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरचे भोंगे उतरविण्याचे आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांच्याविरोधात एकापाठोपाठ एक कायदेशीर ससेमिरा लावण्याची महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवाराची सरकारची तयारी असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या विरोधातल्या जुन्या केसेस बाहेर काढण्यात येत आहेत. Non-bailable arrest warrant against Raj Thackeray in 2008 case
सांगली कोर्टाने 2008 च्या केस मध्ये राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावले होतेच, आता त्यापाठोपाठ परळी कोर्टाने देखील त्याच केसबद्दल राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
2008 मध्ये मनसेने खळखट्याक आंदोलन केले होते. त्यावेळी मनसैनिकांनी परळी मध्ये एसटी बसेसवर दगडफेक केली होती. या आंदोलनाच्या मुद्द्यावरून सांगली कोर्टाने आधी राज ठाकरे यांना तीन वेळा समन्स बजावले होते. परंतु ते सुनावणीला हजर राहिले नाहीत म्हणून काही दिवसांपूर्वी त्यांच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढले. परळी कोर्टाने देखील आता सांगली कोर्टासारखेच अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. अशा पद्धतीने राज ठाकरे यांच्याविरोधात कायदेशीर ससेमिरा अन्य प्रकरणांमध्ये देखील लावण्याचे ठाकरे पवार सरकारने तयारी चालवली आहे.
Non-bailable arrest warrant against Raj Thackeray in 2008 case
महत्वाच्या बातम्या