मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे.No one should go out of the house without a mask; Appeal of Kishori Pednekar
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे.हा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना तसेच नियम लागू करण्यात आले आहेत.दरम्यान मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. ही जमावबंदी 7 जानेवारी 2022 पर्यंत लागू राहणार आहे.
31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील मुंबईकरांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.
यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या की , मुंबईकरांसाठी यंत्रणा सज्ज आहे, मात्र काळजी घ्यावी लागेल. विनामास्क घराबाहेर पडता कामा नये,तसेच मुंबईत बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली जात असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.
पुढे पेडणेकर यांनी मास्क न वापरण्यांविरोधात क्लीन-अप मार्शलकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत म्हटले की, क्लीन-अप मार्शल यांनी मर्यादेत राहून काम करावे.
No one should go out of the house without a mask; Appeal of Kishori Pednekar
महत्त्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या दोन्ही मुलांची अटक निश्चित; वसुलीतील अन्य लाभार्थीही रडारावर – सोमय्या
- दिलासादायक : ओमिक्रॉनवर लसी प्रभावी, जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञ स्वामिनाथन यांचे लसीकरणाचे आवाहन
- ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यात कडेकोट नाकाबंदीचे केले नियोजन
- CORONA UPDATE : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील कोरोना पॉझिटिव्ह ; सोशल मीडियावर दिली माहिती