Thursday, 8 May 2025
  • Download App
    समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांविरुद्ध इथून पुढे आरोप केले जाणार नाहीत ; नवाब मलिक | no more allegations on sameer wanakhede ; nawab malik

    समीर वानखेडे यांच्या कुटुंबियांविरुद्ध इथून पुढे आरोप केले जाणार नाहीत ; नवाब मलिक

    विशेष प्रतिनिधी

    मुबंई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध वारंवार आरोप केले होते. या दोन्ही कुटूंबियांमध्ये मध्यंतरी ट्विटर वॉर सुरू होतो. याविरूद्ध वानखेडे कुटुंबीयांनी न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली होती. समीर वानखेडे यांचे वडील यांनी ही तक्रार दाखल करत मानहानीचा दावा केला होता.

    no more allegations on sameer wanakhede ; nawab malik

    त्यानंतर कोर्टाकडून नवाब मलिक यांना विचारण्यात आले होते की, तुम्ही जे आरोप केले आहेत ते वैयक्तिक पातळीवर केलेले आहेत की राजकीय पक्षाचे प्रवक्ते म्हणून करत आहात? जर तुम्ही वैयक्तिक पातळीवर हे आरोप करत असणार तर तुम्हाला कोर्टात येऊन माफी मागावी लागेल. त्यानंतर नवाब मलिक यांच्या वकिलांनी हे आरोप राजकीय पक्षाचे प्रवक्ते हे म्हणून केले आहेत असे सांगितले होते.


    Nawab Malik On ED Raid : पुण्यातील ईडीच्या छाप्यांवर नवाब मलिक यांचे उत्तर – वक्फ बोर्डाच्या जमिनीवर छापे नाहीत


    त्यानंतर प्रतिज्ञा पत्राद्वारे इथून पुढे असे कोणतेही आरोप केले जाणार नाहीत, असे नवाब मलिक यांनी मान्य केले होते ल. पण तरीदेखील त्यांनी आपले आरोप करण्याचे सत्र चालूच ठेवले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी पुन्हा न्यायालयामध्ये धाव घेतली. यावेळी नवाब मलिक यांनी माफी मागून यापुढे कोणत्याही आरोप करणार नाही असे सांगितले आहे.

    no more allegations on sameer wanakhede ; nawab malik

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण