विशेष प्रतिनिधी
सोलापूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूरकरांनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सहकारातल्या सगळ्याच चेल्यांना गंभीर इशारा दिला आहे. सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्रशिंग होतंय, पण हा ऊस असाच जास्त लावत राहाल तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा,असे गडकरी यांनी म्हटले आहे.Nitin Gadkari’s serious warning not only to the people of Solapur but also to all in the cooperative
गडकरी म्हणाले, आज पाणी हाच सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण पाणी उपलब्ध केलं तर शेतकऱ्यांचे उत्पन्न अडीच पटीने वाढल्याशिवाय राहणार नाही. ते पाणी जर ड्रीपने दिलं तर फारच चांगलं आहे. सोलापूर जिल्हा एकेकाळी दुष्काळी होता. आता बबन दादा सांगत होते त्यांचं २२ लाख टन ऊसाचं क्रशिंग झाले.
एवढ्या मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात ऊसाचं क्रशिंग होतंय. मात्र, हा ऊस असाच जास्त लावत राहाल, तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा शब्द लक्षात ठेवा. कारण साखर सरप्लस झाली आहे.माझ्याकहे दोन दिवसांपूर्वी ब्राझीलचे मंत्री आणि शिष्टमंडळ आले होते.
ब्राझीलमध्ये दुष्काळ पडला म्हणून बबनराव तुमच्या चेहऱ्यावर हास्य आहे, पण ब्राझीलमध्ये साखर वाढली तर साखरेचा दर २२ रुपये प्रतिकिलो भाव होईल. दुसरीकडे ऊसाचा दर कमी करता येणार नाही, कारण तुम्हाला राजकारण करायचं आहे. त्यामुळे ऊसाचा भाव तेवढाच द्यावा लागेल, मग काय स्थिती होईल ते बघा.
Nitin Gadkari’s serious warning not only to the people of Solapur but also to all in the cooperative
महत्त्वाच्या बातम्या
- नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश
- चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!
- पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त
- किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक