विशेष प्रतिनिधी
मुंबई: इथेनॉलचा वापर करून चालू शकणारी फ्लेक्स इंजिन वाहनांना बसवण्यासाठी येत्या तीन महिन्यांत योजना आणली जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.गडकरी म्हणाले, स्थानिक शेतमालाचा वापर करून तयार होत असलेल्या इथेनॉलचा वापर वाढून पेट्रोल व डिझेल या पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व यामुळे कमी होईल.Nitin Gadkari informs that Ethanol-powered Flex engine will be ready in three months
ब्राझील, अमेरिका आणि कॅनडा या देशांतून फ्लेक्स इंजिनाचा वापर सुरू झाला आहे. यामुळे तेथे बीएमडब्ल्यू, मर्सिडिज आणि टोयाटो या कार उत्पादक कंपन्यांना फ्लेक्स इंजिनाची निर्मिती करणे भाग पडले आहे. स्थानिक पातळीवर शेतमालापासून बनवलेले इथेनॉल इंधन म्हणून वापरणे हे भारतासारख्या देशाला निश्चितच परवडणारे आहे.
त्यामुळे कच्च्या खनिज तेलाची आयातही कमी करण्यात यश येऊ शकेल. यामुळे खर्च कमी होईल आणि प्रदुषणही कमी होईल. एक लीटर पेट्रोल १०० रुपयांना मिळत असेल, तर त्या तुलनेत एक लीटर इथेनॉल ६० ते ६२ रुपयांना मिळते.
यासंदर्भात सरकार एक योजना आणणार असून, येत्या तीन महिन्यांत ती लागू होईल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. यासाठी सरकारने १०० टक्के इथेनॉलची विक्री करणारे पंप बसवण्यासाठी परवाने देण्यासाठी सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यामध्ये अशा दोन पंपांचे उद्घाटनही केले आहे.
इथेनॉलवर चालणाºया इंजिनासाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे.केवळ पेट्रोल किंवा डिझेल इंजिनच्या गाड्या देशात असणार नाहीत.
यापुढे लोकांना वाहनांमध्ये फ्लेक्स फ्ल्यूएलचाही पर्याय उपलब्ध होईल. त्यानंतर देशातील वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्ल्यूएल इंजिन अनिवार्य होईल, असे गडकरींनी यापूर्वी म्हटले होते.लेक्स-फ्लूएल इंजिनमुळे वाहनचालकांना १०० टक्के पेट्रोल किंवा १०० टक्के इथेनॉल वापरण्याचा पर्याय वाहनामध्ये उपलब्ध होतो.
इथेनॉल किफायतशीर असून पर्यावरणपूरक तसेच देशांतर्गत उत्पादित होणारे इंधन आहे. यामुळे ग्राहकांची ३० ते ३५ रुपयांची बचत होऊ शकते, असे सांगितले जात आहे. सध्या टीव्हीस आणि बजाज या कंपन्यांना टू-व्हिलरमध्ये इथेनॉलवर चालणारे इंजिन विकसित करण्यात सांगण्यात आले आहे.
Nitin Gadkari informs that Ethanol-powered Flex engine will be ready in three months
महत्त्वाच्या बातम्या
- Corona Vaccine : मॉडर्नापाठोपाठ फायझरचीही कोरोवरील लस येणार, भारतात आतापर्यंत 4 लसींना मंजुरी
- कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा
- गर्भवती महिलांसाठी कोरोनाची लस सुरक्षित, स्तनदा मातांवरही कोणतेही दुष्परिणाम नाही – केंद्र सरकार
- तृणमूलच्या गुंडांचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकावरही हल्ला, बंगाल हिंसाचाराची चौकशी करताना अडथळे
- इस्रायलसारखी भारताचीही ड्रोन डिफेन्स डोम सिस्टिम, ‘इंद्रजाल’च्या साहाय्याने एकाच वेळी अनेक ड्रोन्स पाडण्याची क्षमता