विशेष प्रतिनिधी
मुंबई : कणकवलीचे भाजप आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या विरोधात दाखल केलेल्या खुनाच्या प्रयत्नाच्या कथित खटल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सी व्ही भदंग यांच्या खंडपीठाने राणेंचा जामीन अर्ज मागे घेण्याची मागणी मान्य केली. 27 जानेवारीला सुप्रीम कोर्टाने नितेशच्या अटकेला 10 दिवसांची स्थगिती दिली होती. Nitesh Rane to cancel pre-arrest bail
या प्रकरणी त्यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. आता त्यांनी याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला. ते पोलिसांसमोर आत्मसमर्पण करुन तपास प्रक्रियेत सहकार्य करतील, असे राणे यांच्या वकिलांनी सांगितले. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नितेश पुत्र आहेत.
नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्र न्यायालयाने गेल्या आठवड्यात फेटाळला. त्यांनी जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. मात्र, येथेही त्यांची निराशा झाली. राजकीय वैमनस्यातून आपल्याला खुनाच्या प्रयत्नात गोवण्यात आल्याचा दावा राणे यांनी आपल्या याचिकेत केला होता.
नितेश यांचे वकील सतीश मानशिंदे यांनी सांगितले की, त्यांचा अशिल आत्मसमर्पण करून तपासात सहभागी होऊ इच्छितो. त्यांच्या अटकेच्या स्थगिती काळाचे पाच दिवस शिल्लक आहेत..
Nitesh Rane to cancel pre-arrest bail
महत्त्वाच्या बातम्या
- समीर वानखेडे यांना मोठा धक्का, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केला हॉटेल आणि बारचा परवाना
- भाजपला बंगालच्या उपसागरात फेकण्याच्या केसीआर यांच्या वक्तव्यावर रामदास आठवलेंचा प्रत्युत्तर, म्हणाले- आम्ही त्यांना बुडवून टाकू!
- अनिल देशमुख यांचा ईडीच्या आरोपपत्रात खुलासा, म्हणाले- फक्त यामुळेच गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला
- संजय राऊत यांचे निकटवर्ती प्रवीण राऊत ईडीकडून अटक; १०३४ कोटींच्या जमीन घोटाळ्यात कारवाई