• Download App
    देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांचा पलटवार ! Nitesh Rane Slams Shivsena MLA Sanjay Gaikwad remark over Devendra Fadnavis

    देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शिवसेनेच्या संजय गायकवाड यांच्यावर भाजप आमदार नितेश राणे यांचा पलटवार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: महाराष्ट्र जीवन मरणाच्या सीमेवर उभा आहे.राज्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला आहे . रेमडेसिव्हीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा राज्यात जाणवत आहे. राज्यातील परिस्थिती गंभीर असताना राजकारण मात्र तुफान तापले आहे.Nitesh Rane Slams Shivsena MLA Sanjay Gaikwad remark over Devendra Fadnavis

    बुलडाणा येथील शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केले. संजय गायकवाड यांना भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. नितेश राणे यांनी गायकवाड यांना तो प्रयोग प्रथम मुख्यमंत्र्यांवर कर, अशा प्रकारचं प्रत्युत्तर दिलं.

    संजय गायकवाडांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर आरोप करताना त्यांची भाषा घसरली होती. “मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,” असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले.
    संजय गायकवाड यांना प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी एक ट्विट केलं. त्या ट्विटमध्ये त्यांनी “देवेंद्रजींच्या जवळ जाणे हे तर लांब राहिले. हे या गायकवाडला कोण सांगेल.. पहिला प्रयोग तुझ्या घरकोंबडा मुख्यमंत्र्यावर कर आणि मग बाकीचे बघू, जंतू पार्सल पाठवतो मातोश्रीवर, कुठे घालायची तिथे घाल”, अशा शब्दात टीका केली आहे.

    Nitesh Rane Slams Shivsena MLA Sanjay Gaikwad remark over Devendra Fadnavis

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना