वृत्तसंस्था
मुंबई : राज्यात कोरोना वाढत आहे. त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करणार आहे. नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता.Ninth and eleventh graders will pass; Decision of the Department of Education
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑफलाईन
दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केले. या परीक्षांच्या वेळापत्रकात थोडासा बदल करायचा की नाही याबाबत एक-दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.
परीक्षा ऑफलाईन घ्या ; ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणी
अनेक शााळांमध्ये व खेड्या-पाड्यांत संगणक सुविधा व इंटरनेट सुविधा नाही. यामुळे ग्रामीण भागात परीक्षा आँफलाईन घ्यावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी, विद्यार्थी संघटना, पालक संघटना यांच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.