CSMT Station Redevelopment : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वे, जीएमआर एंटरप्राईजेस, ओबेरॉय रिअल्टी यांच्यासह नऊ कंपन्यांनी कराराची तयारी दर्शवली आहे. भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) ही माहिती दिली आहे. nine companies including Adani Railway in bidding For Mumbai CSMT Station redevelopment Contract
वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) च्या पुनर्विकासाच्या करारासाठी अदानी रेल्वे, जीएमआर एंटरप्राईजेस, ओबेरॉय रिअल्टी यांच्यासह नऊ कंपन्यांनी कराराची तयारी दर्शवली आहे. भारतीय रेल्वे स्थानक विकास महामंडळाने (आयआरएसडीसी) ही माहिती दिली आहे.
मॉलसारखे असेल स्टेशन
सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासाच्या योजनेअंतर्गत या स्थानकास मिनी स्मार्ट सिटी ‘रेलोपोलिस’मध्ये रूपांतरित करण्याची योजना आहे. जिथे लोक राहू शकतात, काम करू शकतात, खेळू शकतील आणि रेल्वेचा प्रवास करू शकतील. यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित होईल आणि व्यवसायाच्या संधी प्रदान होतील.
एकूण नऊ कंपन्या स्पर्धेत
पुनर्विकासानंतर या सर्व स्थानकांवर प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळतील आणि त्यांचा प्रवासाचा अनुभव उत्कृष्ट असेल. या स्थानकाच्या पुनर्विकास कराराच्या बोलीमध्ये भाग घेणाऱ्या नऊ कंपन्यांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज, अँकरगेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग्ज, आयएसक्यू एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट्स, कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन, मोरीबस होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड आणि बीआयएफ आयव्ही इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआयएफसी प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
वृत्तसंस्थेनुसार, आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एसके लोहिया म्हणाले, सीएसएमटी स्थानकाच्या पुनर्विकासासाठी आरएफक्यू (रिक्वेस्ट फॉर कोटेशन) टप्प्यासाठी नऊ कंपन्यांची निवड झाली आहे. पुढील टप्प्यात आयआरएसडीसी लवकरच प्रपोजल फॉर प्रपोजल (आरएफपी) जारी करेल. हा आमच्या सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. आम्ही सीएसएमटी स्टेशन एक अत्याधुनिक परिवहन केंद्र बनविण्यासाठी वचनबद्ध आहोत.
50,000 कोटी रुपयांचा खर्च
आयआरएसडीसीने सांगितले की, या स्थानकाच्या पुनर्विकासावर सुमारे 1,642 कोटी रुपये खर्च केले जातील. हे डीबीएफओटी तत्त्वावर म्हणजेच डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर तत्त्वावर कार्य करेल. विशेष म्हणजे रेल्वे खासगी क्षेत्राच्या सहकार्याने एकूण 123 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्याची योजना आखत आहे, त्यात 63 वर आयआरएसडीसी आणि 60 वर आरएलडीएवर काम करतील. या सर्व स्थानकांच्या पुनर्विकासावर सुमारे 50,000 कोटी रुपये खर्च केले जातील.
nine companies including Adani Railway in bidding For Mumbai CSMT Station redevelopment Contract
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारचा नवा भाडेकरू कायदा, मालमत्तेवर कोणी कब्जा करू शकणार नाही आणि भाडेकरूला अचानक घरी खाली करावे लागणार नाही
- मालमत्ता नोंदणीतून सरकारच्या खजिन्यामध्ये मार्चमध्ये ९ हजार कोटी; वर्षात ११ हजार कोटी
- ज्योतिषांकडून मुहूर्तांच्या नावावर फसवणूक, कोणत्या ज्योतिषाने सांगितले होते कोरोना येणार म्हणून, योगगुरू बाबा रामदेव यांचा सवाल
- ना चाचण्यांची माहिती, डाटाही दिला नाही, तरी पाकिस्तानने आणली कोरोना प्रतिबंधक पाकवॅक लस
- कोरोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ठाकरे – पवार सरकारने लपवल्याचा देवेंद्र फडणवीसांचा आरोप