प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणूक झाली शिवसेनेचा शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. विधान परिषद निवडणुकीची चर्चा देखील सुरू झाली, तरी राज्यसभेचे लळित काही आटोपेनासे झाले आहे. Nilesh Rane mocks Rohit Pawar as Governor of NCP
राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांची जागा सेफ करून घेण्यासाठी राष्ट्रवादीने शिवसेनेचा गेम केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर शरसंधान साधले होते. मात्र त्याला आता भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. निलेश राणे यांनी यासंदर्भात एक ट्विट करून रोहित पवारांची “राष्ट्रवादीचे राज्यपाल” अशा शब्दांत खिल्ली उडवली आहे.
निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात :
राष्ट्रवादीचे राज्यपाल रोहित पवार यांची प्रतिक्रिया बघितली. राज्यपाल रोहित पवार यांनी आजोबांकडे लक्ष द्यावे. कारण आजोबा नेमके काय करतात हे कोणालाच सांगत नसल्यामुळे तुमच्या बरोबर महाविकास आघाडीची पण अडचण झाली आहे. दुसरा परिणाम संज्या (संजय राऊत) लीलावतीत फोन करतोय पण त्याचा फोन कोण घेत नाही.
दुसऱ्या ट्विट मधून निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील शरसंधान साधले आहे. या ट्विट मध्ये ते म्हणतात : अडचणीचे ढग दिसले की अजित पवार मिस्टर इंडिया सारखे गायब होतात. इतिहास सांगतो जेव्हा असामान्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा अजित पवार गुल पण बरं झालं अजित पवार यात पडले नाहीत कारण पहाटेच्या शपथविधीला त्यांच्यासोबत त्यांच्याच पक्षातले आमदार राहिले नाहीत ते बाहेरून आमदार कुठून आणणार?
संजय पवार यांच्या पराभवासाठी शिवसेनेने अपक्ष आमदारांना लक्ष्य केलेले असताना भाजपचे काही नेते आणि अपक्ष आमदार मात्र राष्ट्रवादीला लक्ष्य करताना दिसत आहेत.
Nilesh Rane mocks Rohit Pawar as Governor of NCP