• Download App
    सचिन वाझे केस : वो कौन थी? चा अखेर उलगडा ; मीरा रोड येथून एनआयएच्या कारवाईत बुरखाधारी महिला ताब्यात।NIA detained woman from Mira Road reportedly seen with Sachin Vaze in Mukesh Ambani Antilia Bomb Scare

    सचिन वाझे केस : वो कौन थी? चा अखेर उलगडा ; मीरा रोड येथून एनआयएच्या कारवाईत बुरखाधारी महिला ताब्यात

    • मीना जॉर्जच्या नावे मीरा रोडमध्ये फ्लॅट भाड्याने, 13 तासांच्या तपासानंतर एनआयए महिलेसह मुंबईला रवाना

    • राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मध्ये रात्रभर तपास करत होती NIA detained woman from Mira Road reportedly seen with Sachin Vaze in Mukesh Ambani Antilia Bomb Scare

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई: सचिन वाझे प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आता अजून एक उलगडा एनआयए ने केला आहे. यातून अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटकेत असलेले निलंबित पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यासोबत दिसलेल्या ‘मिस्ट्री वूमन’चं रहस्य उलगडण्याची शक्यता आहे.



    मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्समध्ये एनआयएचे पथक गुरुवारी रात्रीपासून जवळपास 13 तास तपास करत होते. त्यानंतर एका बुरखाधारी महिलेसह एनआयएची टीम मुंबईला रवाना झाली. वाझेंसह हॉटेलमध्ये पैसे मोजण्याचे मशीन हातात असणारी महिला हीच असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

    मीरा रोडच्या रुममध्ये 13 तास तपास

    राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मीरा रोडच्या सेवन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मध्ये रात्रभर तपास करत होती. एनआयएचे पथक एक एप्रिलला (गुरुवारी) संध्याकाळी सहा वाजता दाखल झाली होती. बारा तासांहून अधिक काळ तपास सुरु असल्याने एनआयए पथकाला काही धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    मीना जॉर्ज नावाने रुम भाड्यावर

    सेव्हन इलेव्हन कॉम्प्लेक्सच्या सी विंगमधील रुम नंबर 401 मीना जॉर्ज या महिलेच्या नावाने भाड्यावर घेतली आहे. ही खोली गेल्या 15 दिवसांपासून बंद आहे.

    एनआयएने ताब्यात घेतलेली महिला 16 फेब्रुवारीला सचिन वाझेंसोबत दक्षिण मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये दिसलेली महिला असल्याचा संशय आहे. संबंधित महिला वाझेंची निकटवर्तीय असल्याचं बोललं जात आहे.

    दरम्यान मुकेश अंबानींच्या घराजवळ मिळालेली स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी एनआयए च्या हाती बुधवारी आणखी एक आलिशान गाडी लागली. सचिन वाझे वापरत असलेल्या ऑडी कारचा तपास एनआयए कडून गेल्या काही दिवसांपासून सुरु होता. एनआयए ने  वसई परिसरातून MH 04 FZ 6561 नंबरची ऑडी ताब्यात घेतली.

    NIA detained woman from Mira Road reportedly seen with Sachin Vaze in Mukesh Ambani Antilia Bomb Scare

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!