• Download App
    NIA Antilia Case : पोलीस अधिकारी रियाझ काझींना अटक, अँटिलया प्रकरणात सचिन वाझेंना मदत केल्याचा आरोप । NIA Antilia Case: Police officer Riaz Qazi arrested, accused for helping Sachin Waze

    NIA Antilia Case : पोलीस अधिकारी रियाझ काझींना अटक, अँटिलया प्रकरणात सचिन वाझेंना मदत केल्याचा आरोप

    NIA Antilia Case : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने रविवारी मुंबईचे पोलीस अधिकारी रियाज काझी यांना अटक केली आहे. मुंबई पोलीस अधिकारी रियाज काझींनी सचिन वाझे यांना अँटिलियाच्या कटात मदत केल्याचा आरोप आहे. सचिन वाझे हे आधीपासूनच एनआयएच्या ताब्यात आहेत. NIA Antilia Case: Police officer Riaz Qazi arrested, accused for helping Sachin Waze


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात एनआयएने मोठी कारवाई केली आहे. अँटिलिया प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनआयएने रविवारी मुंबईचे पोलीस अधिकारी रियाज काझी यांना अटक केली आहे. मुंबई पोलीस अधिकारी रियाज काझींनी सचिन वाझे यांना अँटिलियाच्या कटात मदत केल्याचा आरोप आहे. सचिन वाझे हे आधीपासूनच एनआयएच्या ताब्यात आहेत.

    सचिन वाझे यांच्याप्रमाणेच रियाज काझी हे सहायक पोलीस निरीक्षकही आहेत. अँटिलिया प्रकरणाव्यतिरिक्त सचिन वाझे यांची मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशी सुरू आहे. 5 मार्च रोजी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंबईत सापडला. 25 फेब्रुवारीला अंबानींच्या घराजवळ उभी केलेली स्फोटकांनी भरलेली कार ही मनसुख हिरेन यांची होती. यानंतर सचिन वाझे यांना 13 मार्च रोजी अटक करण्यात आली.

    निलंबित मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 23 एप्रिलपर्यंत एनआयएच्या ताब्यात ठेवण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. सचिन वाझे हे मनसुख हिरेन हत्येच्या प्रकरणातील आणि मुकेश अंबानीच्या घराबाहेर संशयास्पद कार सापडल्याप्रकरणी प्रमुख आरोपी आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने सचिन वाझे यांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, जेणेकरून त्यांची चौकशी होऊ शकेल. ही मागणी कोर्टाने मान्य केली आहे. कोर्टाच्या सुनावणीदरम्यान सचिन वाझेंच्या वकिलांनी त्यांच्या जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांना तुरुंगात एक सुरक्षित कक्ष उपलब्ध करून देण्याची विनंतीही त्यांनी कोर्टाला केली.

    वास्तविक, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ आढळलेली स्फोटक कार आणि मनसुख हिरेनच्या हत्येप्रकरणी अटक केलेला पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे कारनामे एवढ्यापुरतेच मर्यादित नाहीत. दहशतवादी संघटनेच्या नावाखाली आणखी एक मोठा कट रचण्यात वाजे यांचा सहभाग असल्याचे एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे. आपला दुसरा कट रचण्यापूर्वी ते स्वत:च्याच विणलेल्या जाळ्यात अडकले. याशिवाय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी केलेल्या आरोपांनुसार सचिन वाझे हे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे हस्तक म्हणून वावरत होते. अनिल देशमुखांनी वाझेंना मुंबईतल्या बार-रेस्तराँमधून दरमहा 100 कोटींची वसुली करण्याचे टारगेट दिल्याचाही आरोप आहे.

    NIA Antilia Case: Police officer Riaz Qazi arrested, accused for helping Sachin Waze

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!